ETV Bharat / politics

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS - RAMDAS ATHAWALE VS MNS

Ramdas Athawale On Raj Thackeray : महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, असं विधान सोलापूर येथील पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. मात्र, या वक्तव्यामुळं आता राज ठाकरेंना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. एवढंच नाही तर रामदास आठवले यांनीही आता मनसेला मतं देऊ नका असं आवाहन केलय.

Ramdas Athawale said Boycott MNS candidates in the Legislative Assembly Elections
रामदास आठवले आणि राज ठाकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 7:34 PM IST

मुंबई Ramdas Athawale On Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपापली कंबर कसलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देत महाराष्ट्रात दौऱ्याला सुरुवात केलीय. मात्र, राज ठाकरेंनी सोलापूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळं आता ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात असताना आरक्षणाची गरज नसल्याचं ते म्हणालेत. त्यामुळं त्यांना आता मराठा आणि ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतय. तसंच मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केल्यामुळं विरोधकांकडूनही टीका केली जात आहे. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

रामदास आठवले यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले रामदास आठवले : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रामदास आठवले म्हणाले, "जोपर्यंत जातीय व्यवस्था संपत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य नाही. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा". तसंच दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, या प्रकारची मागणी सर्वप्रथम आपण केल्याचंही यावेळी आठवले यांनी सांगितलं.

मनोज जरांगेंची मागणी मराठा समाजावर अन्याय करणारी : मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं. मात्र, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजावर अन्याय करणारी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं असून त्याची अंमलबजावणी राज्यात सध्या सुरू असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा -

  1. मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray Vs Maratha Protestors
  2. राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक, भेटीमागचं 'राज'कारण काय? - Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
  3. मनसेनं मतदार फोडण्यासाठी एवढे वर्ष सुपाऱ्याच घेतल्या, अंबादास दानवेंची राज ठाकरेंवर टीका - Ambadas Danve

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.