ETV Bharat / politics

"महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी केली", राज ठाकरेंचा गंभीर आरोप - Raj Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 8:53 AM IST

Raj Thackeray Thane Sabha : महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी रविवारी (12 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी बोलत असताना 'महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी केली', असं विधान ठाकरेंनी केलं. त्यामुळं यावरुन आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Thane Sabha
राज ठाकरे आणि शरद पवार (ETV Bharat)

ठाणे Raj Thackeray Thane Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (12 मे) सायंकाळी कळव्यात, ठाणे लोकसभेतील शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेतील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीरसभा सभा पार पडली. यावेळी फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरेंनी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? : यावेळी जाहीर सभेला संबोधित करत असताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्राच फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली. त्यांनी सर्वप्रथम काँग्रेस फोडली आणि पुलोद स्थापन केलं. 1991 मध्ये शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली. तेव्हा शिवसेनेचे आमदार फोडायचं कामही पवारांनीच केलं होतं. मात्र, या फोडाफोडीबाबत आजचे नेतृत्व याअगोदर कधीही टाहो फोडताना दिसले नाही."

...हा जोड पुढच्या वेळी आतून लावा : श्रीकांत शिंदे यांनी मनसे आणि शिंदे सेना हा फेविकॉल का जोड आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याचा उल्लेख करून राज ठाकरे म्हणाले की, "फेविकॉलचा हा जोड पुढच्या वेळी आतून लावा. नाही तर आमची बाजू नेहमी बाहेरचीच असेल. तसंच आमचा फक्त बाहेरून पाठिंबा आहे. आम्हाला अजून कुठं फेविकॉल लागलाय", असं म्हणत राज ठाकरेंनी भरसभेत महायुतीला टोला लगावला.

परप्रांतीयांना पुन्हा केलं टार्गेट : भाषणादरम्यान राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांना टार्गेट केलं. ते म्हणाले की, "बाहेरचे लोंढे येण्याचं सर्वाधीक प्रमाण ठाणे जिल्ह्यात असून हे लोंढे जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत विकास होणार नाही. तलावांचं शहर बुजवून आता ठाणे हे टँकरचं शहर झालंय. वाढत्या लोकसंख्येमुळं या एका जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत. त्यामुळं डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही भावी खासदारांनी हे मुद्दे लोकसभेत मांडावे", असा सल्ला त्यांनी दिला. तसंच आतापर्यंतचा कोणताही महत्त्वाचा विषय नसलेली ही लोकसभा निवडणूक आहे. लोकांच्या जीवनमरणाचे विषय सोडून वडील चोरले या विषयावर बोललं जातंय. तसंच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले, असा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला.

आनंद आश्रमाला दिली भेट : सभेपूर्वी राज ठाकरेंनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तसंच आनंद मठात गेल्यावर आनंद आश्रमातील जुने दिवस आठवल्याचं सांगत त्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा -

  1. "भाजपाला आता राज ठाकरेंची गरज भासली, इतके दिवस...."; रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल - Ravindra Dhangekar On Raj Thackeray
  2. मौलवींच्या फतव्यानंतर राज ठाकरेंनी काढला फतवा; म्हणाले.... - Raj Thackeray Pune Sabha
  3. नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.