अमरावती Amit Shaha News : अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेसाठी 'सायन्स कोर' मैदानावर (Science Score Ground) भव्य मंडप उभारण्यात आला. अमित शाह यांचं भाषण सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. यामुळं दोन्ही बाजूच्या मंडपातील गर्दीची धावपळ सुरू झाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी खुर्चीचा आश्रय घेतला. एकूणच परिस्थितीचं गांभीर्य पाहून अमित शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रेमापोटी डोक्यावर खुर्च्या घेऊन देखील आपण भाषण ऐकत आहात, अशा शब्दात गर्दीची प्रशंसा करत भाषण आटोपतं घेतलं.
अमित शाह यांच्या आगमनापूर्वी सुटला मंडप : अमित शाह यांचं सभामंचावर आगमन होण्यापूर्वी देखील सभामंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या मंडपाचं छत जोरदार हवेमुळं निसटलं. या भागात बसलेल्या महिलांनी आपल्या हाताने तसंच खुर्चीद्वारे छत धरून ठेवलं होतं. एकूणच अमित शाह सभा मंचावर येण्याच्या पूर्वी तसंच त्यांचं भाषण सुरू असताना काहीसा गोंधळ उडाला. मंगळवारी सायंकाळी देखील अमित शाह यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप वादळामुळं कोसळला होता. हा मंडप रात्रीतून कसाबसा उभारण्यात आला. आज पावसामुळं पुन्हा एकदा हा मंडप अर्धा कोसळला होता.
बच्चू कडू आणि राणा यांच्या सभास्थळाचा वाद : अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांनी सभेसाठी परवानगी मिळवली होती. त्यानंतर आता त्याच सभास्थळावर अमित शाह यांची सभा होती. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी बच्चू कडू यांची परवानगी काढून घेण्यात आली होती. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. मैदानाच्या परवानगीवरुन बच्चू कडू यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली होती.
हेही वाचा -
- अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा, बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu
- केवळ 22 अरबपतींना नाही, तर कोट्यवधी लोकांना लखपती करणार; राहुल गांधी यांची घोषणा - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार; 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला - Lok Sabha Election 2024