ETV Bharat / politics

"शरद पवारांनी आयुष्यभर..."; राहुल नार्वेकर यांची टीका - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) काही दिवसांपासून प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रत्येक सभेत त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. दरम्यान, शनिवारी "मोदी की गॅरंटी" या कार्यक्रमाचं (Modi Ki Guarantee) मुंबईतील आयएमसी येथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून मागील दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात कोण कोणती कामे केली याचा लेखाजोखा मांडण्यात आला. यावेळी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलंय.

Rahul Narvekar And Sharad Pawar
शरद पवार-राहुल नार्वेकर फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 9:16 PM IST

Updated : May 5, 2024, 9:43 PM IST

प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर (Reporter AMRUT BHARMU SUTAR)

मुंबई Lok Sabha Election 2024 : केंद्रात भाजपाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तसेच मागील दहा वर्षात भाजपानं कोण कोणती कामे केली याची विविध कार्यक्रमातून माहिती देखील दिली जात आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईतील आयएमसी येथे "मोदी की गॅरंटी" या कार्यक्रमाचं (Modi Ki Guarantee) आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून मागील दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात कोण कोणती कामे केली याचा लेखाजोखा मांडण्यात आला. तसेच भारताचे नाव मोदी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं गाजत आहे. देशाचा गौरव कसा होत आहे, याची देखील माहिती देण्यात आलीय. या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय नेते नलीन कोहली, भाजपा नेते राज पुरोहित, अतुल शहा, प्रवक्त्या सायना एन सी, तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलंय.

स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश हा माझा कुटुंब आहे, असं म्हटलं होतं. यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ज्यांना स्वतःचं कुटुंब सांभाळता येत नाही ते देशाचे काय कुटुंब सांभाळणार?. यावर नार्वेकर म्हणाले की, ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केलं आहे. त्यांना देशाचं कुटुंब काय समजणार. फक्त स्वतःचा पक्ष आणि स्वतःसाठी राजकारण करणं हे ज्यांनी केलंय त्यांच्याकडून अशाच प्रकारची अपेक्षा असणार, बाकी कोणती अपेक्षा करणार? असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

उद्धवजींनीच मोदींची साथ सोडली : उद्धव ठाकरे जेव्हा संकटात असतील तेव्हा त्यांच्या मदतीला जाणारे पहिले व्यक्ती हे नरेंद्र मोदी असेल असं मोदींनी म्हटलं होतं. मात्र, आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष अडचणीत आहे. पक्षातील नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. एवढं मोठं संकट असताना नरेंद्र मोदी त्यांच्या मादतीला का धावत नाहीत? ते कोणत्या संकटाची अपेक्षा करत आहेत? असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांच्या विविध संकटात, प्रसंगात उभे राहिले आहेत. त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ सोडली. पंतप्रधान मोदी हे मित्र असो किंवा शत्रू असो ते कोणामध्येही भेदभाव करत नाहीत. त्यांच्या मदतीला धावून जातात. आता उद्धव ठाकरे काही त्यांचे शत्रू नाहीत. त्यांनाही गरज पडेल तेव्हा ते मदतीला येतील आणि मोदी काम करत असताना, कोणालाही मदत करत असताना, कोणताही निकष ठेवत नाहीत. ते मोठ्या मनानं सर्वांना मदत करतात. त्यांचं मन मोठं आहे. असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले.

महागाई अभूतपूर्व नाही : देशात 2014 नंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढलीय. या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, ही महागाई काही अभूतपूर्व नाही, यापूर्वी देशात महागाई होती. परंतु, जी मोदी सरकारच्या काळात कामे झालेत याच्याकडंही तुम्ही लक्ष दिलं पाहिजं. उज्वला गॅस योजनेचं विक्रमी वाटप झालं किंवा पीएम आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना घर मिळाले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं इतर देशात महागाई वाढलेली आहे, त्या तुलनेत आपल्या देशात महागाई कमीच असल्याचं राहून नार्वेकर म्हणाले.

आमचे उमेदवार विजयी होतील : ईशान्य लोकसभा मतदारसंघातून मतांचं विभाजन करण्यासाठी नंदेश उमप यांनी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपानं त्यांना हुसकावलं असल्याचं चर्चा आहे, यावर नार्वेकर म्हणाले की, जिथे ऑलरेडी भाजपाचा उमेदवार आहे आणि ते मोठ्या फरकानं जिंकून येणार आहेत. असं असताना, आमच्याकडून दुसऱ्या उमेदवाराला हुसकवण्याचा प्रश्नच येत नाही. ईशान्य मुंबईत भाजपाचे मिहीर कोटेचा हे उमेदवार आहेत आणि ते मोठ्या मताधिक्यानी निवडून येणार आहेत असं नार्वेकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. हेमंत केरकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar
  2. शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या 'क्षितीज'चा मनोरंजन जगतात होता दबदबा - Kshitij Zarapkar passed away
  3. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नसीम खान यांना पुन्हा स्थान, काय म्हणाले नसीम खान? - lok sabha election

Last Updated : May 5, 2024, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.