ETV Bharat / politics

"माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Shivaji Maharaj Statue Collapse - SHIVAJI MAHARAJ STATUE COLLAPSE

Rahul Gandhi on Shivaji Maharaj Statue Collapse : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याहस्ते आज (5 सप्टेंबर) सांगलीतील कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळ्याचं उद्घाटन झालं. यावेळी बोलत असताना राहुल गांधींनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

Rahul Gandhi criticized PM Modi over Shivaji Maharaj Statue Collapse says who apologizes is the one who does wrong
राहुल गांधी, नरेंद्र मोदी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 4:04 PM IST

सांगली Rahul Gandhi on Shivaji Maharaj Statue Collapse : काही दिवसांपूर्वी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेवरून आता विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जो चुकीचं काम करतो, तोच माफी मागतो, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी : यावेळी बोलत असताना राहुल गांधी म्हणाले, "आज आपण पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यावेळी मी विचार करत होतो की, कदमजींनी 60 वर्षे आपल्यासोबत काम केलं. त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. त्यांनी 60 वर्षात कधीही माफी मागितली नाही. का मागितली नाही, कारण गरज पडली नाही. हेच सत्य आहे. माफी तोच मागतो, जो चुकीचं काम करतो", असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय.

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी : गांधी पुढं म्हणाले, "काही दिवसांपूर्वी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी शिवाजी महाराजांची माफी मागतो. मात्र, त्यांनी माफी मागण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, या पुतळ्याचं कंत्राट राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणाला तरी देण्यात आलं असेल. त्यामुळं त्यांना वाटत असेल की त्यांनी हे कंत्राट गुणवत्तेवर द्यायला हवं होतं." तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळं त्यांनी फक्त केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागितली पाहिजे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण; म्हणाले, "इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत..." - Rahul Gandhi Maharashtra visit
  2. शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर झाला होता फरार - shivaji maharaj statue collapse
  3. "उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?"; महाराजांच्या 'त्या' घटनांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.