पुणे Pune Lok Sabha Constituency : सध्या देशभरात लोकसभा निवडणूक होत आहे. राष्ट्रीय पक्षांच्या बरोबरच विविध प्रादेशिक पक्षांकडून निवडणूक लढवली जात आहे. यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत पुण्यासह अनेक लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या बरोबर अनेक उमेदवारांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात यंदाच्या यंदाच्या या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात आहेत. तर पुणे लोकसभा मतदार संघात आतापर्यंत 11 उमेदवारांनी अर्ज भरलाय. एकूणच पुणे लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. तर पुणे लोकसभा मतदार संघात 1957 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोनच उमेदवार रिंगणात होते. तर सर्वाधिक 44 उमेदवार 1996 च्या निवडणुकीत रिंगणात होते.
कोणत्या लोकसभा निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात : पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर 1951 च्या लोकसभेत पुणे मध्य - 4 उमेदवार, 1951 पुणे दक्षिण - 3 उमेदवार आणि 1957 मध्ये 2 उमेदवार, 1962 मध्ये 4 उमेदवार, 1967 मध्ये 3 उमेदवार, 1971 मध्ये 5 उमेदवार, 1977 मध्ये 7 उमेदवार, 1980 मध्ये 14 उमेदवार, 1984 मध्ये 21उमेदवार, 1989 मध्ये18 उमेदवार, 1991मध्ये 36 उमेदवार, 1996 मध्ये 44 उमेदवार, 1998 मध्ये 15 उमेदवार, 1999 मध्ये 14 उमेदवार, 2004 मध्ये 22 उमेदवार, 2009 मध्ये 36 उमेदवार, 2014 साली 30 उमेदवार, 2019 मध्ये 32 उमेदवार रिंगणात होते. एकूणच पुणे लोकसभा मतदार संघात आत्तापर्यंत सर्वात कमी 1957 साली 2 उमेदवार रिंगणात होते. तर सर्वात जास्त 1996 मध्ये 44 उमेदवार हे रिंगणात होते. यंदाच्या या निवडणुकीत 11 उमेदवारांनी आपलं उमेदवारी अर्ज हे दाखल केले आहेत.
मतदारांनी घेतला हात आखडता : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा विचार केला तर मतदानाचा अधिकार वापरताना पुणेकर नागरिकांनी आत्तापर्यंत हात अखडता घेत असल्याचं आजपर्यंच्या निवडणुकांतून दिसून आलंय. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का 50 च्या आतच राहिलेला आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत पुणे मध्य आणि पुणे दक्षिण असे दोन लोकसभा मतदार संघ होते. त्यात 7 लाख 67 हजार 296 मतदार होते. यातील 3 लाख 71 हजार 695 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या आत होती. पहिल्या निवडणुकीच्या तुलनेत एकट्या पुणे लोकसभा मतदार संघात तीन पट म्हणजे सुमारे 21 लाख मतदार झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदार संघात 20 लाख 75 हजार 824 मतदारांपैकी 10 लाख 35 हजार 236 म्हणजेच 49.87 टक्के मतदारांनी मतदान केलं असल्याचं समोर आलं.
1967 च्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान : पुणे लोकसभा मतदार संघातील पहिल्या निवडणुकीपासून ते 17 व्या लोकसभा निवडणुकीपर्यंत 1967 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकाचवेळी 69.64 टक्के मतदान झालं होतं. त्यावेळी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. तर मतदारांची संख्या 4 लाख 37 हजार 596 होते. त्यातील 3 लाख 4 हजार 742 मतदारांनी मतदान केलं. मात्र, यातील 13 हजार 492 मतं बाद ठरली होती. तर 2009 च्या निवडणुकीत 35 उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी 18 लाख 9 हजार 953 मतदारांची संख्या होती. यातील 7 लाख 4 हजार 641 मतदारांनी म्हणजेच 40.66 टक्के मतदारांनी मतदान मतदान केले होते. ही टक्केवारी आजपर्यंतची सर्वात कमी म्हणूव नोंदवली गेलीय.
पुणे लोकसभा मतदार संघात कोणत्या वर्षी किती मतदान झालं :
- 1951 लोकसभा
पुणे मध्य
मतदार - 388404
झालेलं मतदान - 192406
टक्केवारी - 49.54
पुणे दक्षिण
मतदार – 378892
झालेलं मतदान - 179289
टक्केवारी - 47.32
1957 लोकसभा
मतदार - 357242
झालेलं मतदान - 243408
टक्केवारी - 68.14
1962 लोकसभा
मतदार – 434811
झालेलं मतदान – 287463
टक्केवारी - 64.04
1967 लोकसभा
मतदार – 437596
झालेलं मतदान - 304742
टक्केवारी - 69.64
1971 लोकसभा
मतदार - 516433
झालेलं मतदान - 271969
टक्केवरी - 67.95
1977 लोकसभा
मतदार - 606601
झालेलं मतदान - 382043
टक्केवारी - 62.98
1980 लोकसभा
मतदार - 741735
झालेलं मतदान – 429276
टक्केवारी - 57.87
1984 लोकसभा
मतदार - 788975
झालेलं मतदान – 523706
टक्केवारी - 66.38
1989 लोकसभा
मतदार - 1070901
झालेलं मतदान - 687651
टक्केवारी - 64.21
1991 लोकसभा
मतदार – 1184618
झालेलं - 570624
टक्केवारी - 48.17
1996 लोकसभा
मतदार - 1364999
झालेलं - 778102
टक्केवारी - 57
1998 लोकसभा
मतदार - 1392818
झालेलं मतदान – 830072
टक्केवारी - 59.60
1999 लोकसभा
मतदार - 1435101
झालेलं मतदान - 749454
टक्केवारी - 52.22
2004 लोकसभा
मतदार - 1608614
झालेलं मतदान - 769177
टक्केवारी – 47.82
2009 लोकसभा
मतदार - 1806953
झालेलं मतदान - 734641
टक्केवारी - 40.66
2014 लोकसभा
मतदार - 1835835
झालेलं मतदान - 993966
टक्केवारी - 54.14
2019 लोकसभा
मतदार - 2075824
झालेलं मतदान - 1035236
टक्केवारी - 49.87
हेही वाचा :