ETV Bharat / politics

पुण्यात पुन्हा गँगवॉर; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या, 3 जणांची चौकशी सुरू - Vanraj Andekar Firing

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 10:39 PM IST

Updated : Sep 2, 2024, 7:20 AM IST

Vanraj Andekar Firing : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना नाना पेठेत घडली. या गोळीबारात सुरुवातीला वनराज आंदेकर गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

Vanraj Andekar Firing
नगरसेवकावर गोळीबार (Source - ETV Bharat)

पुणे Vanraj Andekar Firing : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आलीय. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पुण्याच्या मध्यभाग असलेल्या आणि नेहमीच गर्दी असलेलं ठिकाण गणेश पेठ येथं हा गोळीबार करण्यात आला. 15 ते 16 जणांच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आला.

घरगुती वादातून फायरिंग? : घरगुती वादातून बंडु आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर यानं फायरिंग केल्याचं सांगितलं जात आहे. गणेश कोमकर यानं काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अँसिड हल्ला केला होता. बंडु आंदेकर हे वनराज आंदेकर यांचे वडील आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पुण्यातील गणेश पेठ येथील घरासमोरच 15 ते 16 जणांच्या टोळीकडून पाच गोळ्या झाडण्यात आल्या. यात वनराज यांचा मृत्यु झाला. गोळीबार करणारे फरार झाले असून, घटनास्थळी समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह गुन्हे शाखेचे पदाधिकारी हे दाखल झाले. पूर्ववैमन्यासातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेनं पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवॉर सुरू झालं की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय- वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट आहे. पुणे पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 3 जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

हेही वाचा

  1. "काही लोक साथ तर देतात, मात्र मागून..."; नवनीत राणांचा गद्दारांना टोला - Navneet Rana
  2. "शिवाजी महाराजांचं नाव घेतात अन् काम औरंगजेब आणि अफजलखानासारखं"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार - Shivaji Maharaj Statue Collapse
  3. "उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?"; महाराजांच्या 'त्या' घटनांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Last Updated : Sep 2, 2024, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.