ETV Bharat / politics

'संजय, कितना झूठ बोलोगे?'; प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करून राऊतांवर हल्लाबोल - Prakash Ambedkar On Sanjay Raut - PRAKASH AMBEDKAR ON SANJAY RAUT

Prakash Ambedkar On Sanjay Raut : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आंबेडकरांच्या या निर्णयामुळं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलाच फटका बसणार आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Prakash Ambedkar On Sanjay Raut
प्रकाश आंबेडकर आणि खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 7:36 PM IST

मुंबई Prakash Ambedkar On Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागावाटपाचा महाविकास आघाडीतील वाद थांबायला तयार नाही. ठाकरे शिवसेनेनं लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय. त्यामुळं महाविकास आघाडीला वंचितचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करुन राऊतांच्या दाव्याची हवा काढली आहे.

प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो रे' चा नारा : गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. त्याचा फटका सर्वात जास्त हा महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला होता. नकळत त्याचा सर्व फायदा भाजपाला झाला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच ठाकरे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरुवातीपासून आजपर्यंत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आपली चर्चा सुरू असल्याचं देखील वारंवार महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून सांगितलं जातय. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची उमेदवार यादी घोषित करून 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता, यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत, खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे ट्विट : संजय राऊत यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना, प्रकाश आंबेडकर यांनी हिंदीमध्ये एक ट्विट केलंय. त्याचबरोबर एक फोटो देखील पोस्ट केला आहे. फोटोत एक तरुण दाखवण्यात आला आहे. तरुणाच्या फोटोवर (VBA) म्हणजे 'वंचित बहुजन आघाडी' लिहिलं आहे. त्या तरुणाच्या पाठीवर एक हात दाखवण्यात आला असून त्याच्या हातात सुरा दिला आहे. त्या हातावरत संजय राऊत लिहिण्यात आलं आहे. ट्विटची सुरूवात करताना संजय किती खोटं बोलणार असं शीर्षक देऊन प्रश्न विचारण्यात आला आहे. तुमची आणि माझी मते सारखीच असती तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावलं नाही असा प्रश्न विचारला आहे. वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात असं देखील आंबेडकर विचारत आहेत. सहयोगी म्हणता आणि पाठीवर वार करता. सिल्व्हर ओक मधील बैठकीत तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला माहितीय.अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तसंच तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते तयार करून एका बाजूला आघाडी दाखवायची दुसऱ्या बाजूला पदरात पाडून घेण्यासाठी कारस्थान करायचं हे तुमचे विचार आहेत का? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर भडीमार आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. अडसूळ, कडू यांचा विरोध असतानाही भाजपाकडून नवनीत राणांचं तोंड गोड - Amravati Constituency War
  2. पुणे भाजपामधील धुसफूस चव्हाट्यावर, 'या' बड्या नेत्यानं व्यक्त केली नाराजी - Pune Lok Sabha Constituency
  3. 'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच'; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार यांना कार्यकर्त्यांचा आग्रह - Ajit Pawar Group

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.