ETV Bharat / politics

'गड आला पण सिंह गेला'; ठाण्यात ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी तर शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तराचे बॅनर - Lok Sabha Election Result

Thane Poster War : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या आशयाचे बॅनर ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेत लावण्यात आले आहेत.

ठाण्यात ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी तर शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तराचे बॅनर
ठाण्यात ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी तर शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तराचे बॅनर (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 6:23 PM IST

ठाणे Thane Poster War : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेत 'गड आला पण सिंह गेला' या आशयाचे बॅनरस लागले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी 2 लाख 17 हजार 11 मतांनी विजय मिळवून ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दारुण पराभव केला.

ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय : ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत असल्यानं सर्वांचंच लक्ष ठाण्याकडे होतं. ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी एकही आमदार किंवा नगरसेवक नसतानाही शिवसैनिकांच्या मदतीनं ठाण्यात जोरदार प्रचार केला. प्रचार उत्तमरीत्या पार पडला असूनही निकाल त्यांच्याविरोधात गेला. मतमोजणीच्या फेऱ्यांदरम्यान धनुष्यबाणाचा विजय स्पष्ट होत गेला आणि मशालीची चमक कमी होत गेली. अखेरच्या फेरीत नरेश म्हस्के यांना 7 लाख 34 हजार 231 मतं मिळाली तर राजन विचारे यांना केवळ 5 लाख 17 हजार 220 मतं मिळाली. या निवडणुकीत ठाकरे गटाचा ठाण्यातील एकमेव मोठा आधार संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर चंदनवाडी शाखेत 'गड आला पण सिंह गेला' बॅनर लावल्यानं ठाणेकरांचं लक्ष वेधलंय, असे पोस्टर्स इतर ठिकाणी ही लावण्यात आले आहेत. ठाणेकरांना हा पराभव मान्य नसून, पुढील निवडणुकीत आम्ही पुन्हा ताकद दाखवू असं ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रदीप शिंदे यांनी सांगितलंय.

दोन्ही बाजूंनी एकमोकांना डीवचण्याचा प्रयत्न : ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी राजन विचारे यांच्या पराभवानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. तरीही शिवसैनिकांनी आपली निष्ठा कायम ठेवून भविष्यातील लढतींसाठी तयार राहावं, असा संदेश या पोस्टर्सच्या माध्यमातून दिलाय. दुसरीकडं शिंदे गटाकडून चहावाला पंतप्रधान होवू शकतो, रिक्षावाला मुख्यमंत्री होवू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार होवू शकतो अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर युध्दात दोन्ही बाजूंनी एकमेकांना डीवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामुळं भविष्यातील पालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे कडवड झुंज पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. नवनीत राणा यांचा पराभव का झाला? प्रवीण पोटे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतं 'हे' सांगितलं कारण - Pravin Pote Resignation
  2. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठकीत काय होणार चर्चा? - NCP Meetings Inside story

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.