ETV Bharat / politics

बदलत्या राजकारणानं कट्टर विरोधकांमध्ये झाला 'दोस्ताना', कोल्हापूर जिल्ह्यात कसे आहे राजकीय वारे? - KOLHAPUR ASSEMBLY ELECTION 2024

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, इचलकरंजी आणि शिरोळ या तीन विधानसभा मतदारसंघात राजकीय विरोधक असलेले नेते एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या राजकीय समीकरणांचा सविस्तर रिपोर्ट वाचा.

Kolhpaur 3 Constituency  Assembly election
कट्टर विरोधकांमध्ये दोस्ताना (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 7:36 AM IST

Updated : Nov 1, 2024, 7:45 AM IST

कोल्हापूर- राजकारणात कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र कधीच नसतो, याचं उत्तम उदाहरण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. कधीकाळी एकमेकांविरोधात लढलेले दोन कट्टर विरोधक आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून निवडणुकीला सामोरं जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे. कधी काळच्या कट्टर विरोधकांचा आता 'दोस्ताना' रंगला आहे.

कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे कट्टर विरोधक- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रमुख केंद्र असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मुश्रीफ- घाटगे यांनी एकमेका विरोधात पाच विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. 1998 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकदाच संजय घाटगे यांना विजय मिळाला. तर पाच वेळा हसन मुश्रीफ कागल विधानसभेतून विजयी होत आले आहेत. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही संजय घाटगे- मुश्रीफ यांच्या विरोधात उभे होते. मात्र, गेल्या पाच वर्षात राज्यात आलेल्या महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये दोन्ही वेळा मंत्रीपदावर विराजमान झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून एकेकाळच्या आपल्या विरोधकाला मदतीचा हात दिला. त्यांना जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालक पदावरही संधी दिली. त्यामुळे या दोघांमधील "दोस्ताना' अधिक घट्ट झाला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यातील दोस्ती कार्यकर्त्यांना रुचते का? यावर विजयाचं गणित ठरणार आहे.

आवाडे- हळवणकर पारंपरिक विरोधक झाले मित्र- वस्त्रनगरी म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात गेली चार दशक आवाडे कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सुरेश हाळवणकर यांनी आवाडेंचा बालेकिल्ला छेदत विजय संपादन केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे टाकले. या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी बाजी मारत विजयश्री खेचून आणली. यानंतर राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून लढलेले प्रकाश आवाडे भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झाले. आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे हळवणकर यांची मात्र गोची झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश हळवणकर आणि प्रकाश आवाडे यांनी एकत्र येत राहुल आवाडे यांच्या मागे विधानसभेसाठी ताकद उभी केली आहे. कधीकाळी एकमेकांना आव्हान- प्रतिआव्हान देणाऱ्या या दोन मातब्बर नेत्यांची आता खरी कसोटी लागणार आहे.

शिरोळमध्ये पाटील-मादनाईक यांच्या दोस्तीत कुस्ती- शेतकरी आंदोलन आणि चळवळीचं केंद्र अशी ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कधी काळचे खंदे शिलेदार उल्हास पाटील आणि सावकार मादनाईक 2014 च्या विधानसभेला एकमेका विरोधात लढले. या निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेल्या उल्हास पाटील यांचा विजय झाला. गेली 10 वर्ष पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिरोळची जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसला गेली. त्यामुळे उल्हास पाटील स्वग्रही परतले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाच्या अनिल उर्फ सावकार मादनाईक यांच्यासह विद्यमान आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर अशी लढत झाली होती. आता दहा वर्षानंतर स्वगृही परतलेल्या उल्हास पाटील यांच्यासोबत सावकार मादनाईक खांद्याला खांदा लावून लढणार आहेत.

कशी असणार राजकीय समीकरणे? जिल्ह्यातील कागल, इचलकरंजी, शिरोळ या तीनही विधानसभा मतदारसंघात संस्थात्मक सहकाराचं जाळ आहे. सहकाराच्या राजकारणावरच विधानसभेची समीकरणे ठरलेली आहेत. अनेकांना पर्याय उपलब्ध झालेत. मात्र, दहा वर्षापूर्वी एकमेकांना आव्हान देणारे नेते कधी काळचे कट्टर विरोधक आता एकमेकांचे मित्र बनून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. राज्यातील दोन प्रमुख पक्षात फूट पडल्यानंतर बदललेली सत्ता समीकरणं आणि परिस्थिती पाहता या मातब्बर राजकारण्यांची ही अपरिहार्यता आहे का? असा सवाल आता सामान्य मतदार विचारत आहेत. मातब्बर नेत्यांमधील ही युती मतदारांना साद घालते का? यावरच विजयाचा गुलाल कोण उधळणार? हे ठरणार आहे.

हेही वाचा-

  1. कोल्हापूरच्या राजघराण्यातील सदस्याविरोधात कशी असणार रणनीती? पाहा राजेश क्षीरसागर यांची EXCLUSIVE मुलाखत
  2. व्हीलचेअर, वॉकर घेऊन मनसेच्या उमेदवारानं दाखल केला अर्ज; कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  3. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा जनतेचा पॅटर्न, 'कोल्हापूर उत्तर'बाबत सतेज पाटील स्पष्टच बोलले...

Last Updated : Nov 1, 2024, 7:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.