ETV Bharat / politics

"...म्हणून तुम्ही तुरुंगाच्या भीतीनं पळाला", एकनाथ शिंदेंच्या आरोपावर काय म्हणाले विरोधक? - Eknath Shinde allegation - EKNATH SHINDE ALLEGATION

Eknath Shinde News : देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारनं आखला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Political Leaders Reaction On Eknath Shinde allegation regarding bjp leaders arrest plan
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 8:23 PM IST

मुंबई Eknath Shinde News : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. तसंच प्रचारादरम्यान सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं भाजपातील चार नेत्यांच्या अटकेचा कट आखला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्या 'या' आरोपावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

...म्हणून तुम्ही तुरुंगाच्या भीतीनं पळाला : मुख्यमंत्री शिंदेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंही होते. पण ते स्वतः तुरुंगाच्या भीतीनं पळाले. भाजपा त्यांना ईडी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून जेलमध्ये टाकणार होते, म्हणून ते घाबरले आणि त्यांनी पळ काढला. एकनाथ शिंदेंनी केलेला आरोप खोटा आहे. भाजपात भ्रष्टाचार करणाऱ्यांना, खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे. तसंच भाजपामध्ये गेल्यावर खोटं बोलण्याचं रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. आता एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून खोटं बोल पण रेटून बोल असं सुरु आहे. पण आज जरी एकनाथ शिंदे यांची जेलवारी टळली असली तरी उद्या किंवा परवा त्यांना जेलमध्ये जावंच लागेल", असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला.

स्वतःच्या मुलाला सीएम करण्यासाठी कट : यासंदर्भात ईटीव्ही भारतशी संवाद साधत असताना शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या की, "उद्धव ठाकरेंनी सर्व तत्वांना, विचारांना हरताळ फासत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी मविआ विरोधात जे कोणी बोलेल, त्यांना कपटी भावनेनं जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जायचा. तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती होती. मात्र, आदित्य ठाकरेंना सीएम करण्यासाठी भाजपातील नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला जायचा."

हिंदुत्वाच्या विचारांची पायमल्ली : "मागील आठ दिवसांपासून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलताहेत, जी टीका करत आहेत, त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आरोप केलेत त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं. कारण, बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला सारुन त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावत सत्ता स्थापन केली होती. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पुत्र प्रेमासाठी हिंदुत्वाच्या विचारांची पायमल्ली करून उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेले. तसंच तत्कालीन महाविकास आघाडी सरकार हे भाजपातील नेत्यांच्या अटकेचा कट रचत होते. हे त्यावेळेच्या परिस्थितीवरुन लक्षात येतं", अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

माझ्या कामात आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेप : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मी महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना माझे मंत्रीपद उद्धव ठाकरे काढून घेणार होते. माझ्यावर दबाव होता, आणि तासनतास मला वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे ताटकळत ठेवत असत. मला गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं. माझ्या अनेक कामात हस्तक्षेप केला जायचा. माझ्या कामात आदित्य ठाकरे वारंवार हस्तक्षेप करायचे. अनेक खात्यासंदर्भातील बैठका परस्पर आदित्य ठाकरे घ्यायचे. त्यामुळं मला स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नसल्याचंही शिंदे म्हणाले.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्री आले सहकाऱ्याच्या मदतीला, म्हणाले... - CM Eknath Shinde
  2. गेल्या 50-60 वर्षांत काँग्रेसला करता आलं नाही ते मोदींनी केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Lok Sabha Election 2024
  3. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल असं मोदींचं काम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.