ETV Bharat / politics

नागपूर विमानतळावर पंतप्रधान मोदींनी केली कार्यकर्त्यांची विचारपूस; कार्यकर्ते म्हणाले,... - नागपूर विमानतळ

PM Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नागपूर विमानतळावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर कार्यकर्त्यांनी आमच्या जीवनाचं सार्थक झालं अशा भावना व्यक्त केल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तसच त्यांनी यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशावरही भाष्य केलंय.

नागपूर विमानतळावर पंतप्रधान मोदींनी केली कार्यकर्त्यांची विचारपूस; कार्यकर्ते म्हणाले,...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 1:02 PM IST

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर PM Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणाला जाण्यापूर्वी त्यांचं नागपूर विमानतळावर आगमन झालं. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 35 कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. त्यानंतर नरेंद्र मोदी हे तेलंगणासाठी रवाना झाले. यानंतर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलीय. तसंच यावेळी त्यांनी नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशावरही भाष्य केलंय.

नवनीत राणांचा पक्ष प्रवेश नाही : मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र नवनीत राणांसह सर्व कार्यकर्त्यांना संमेलनाला बोलवण्यात आलंय. नवनीत राणा यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलाय. तिथं कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही त्या सहयोगी म्हणून येतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार : महायुतीतील जागावाटपावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "प्रत्येक पक्षाला अधिकच्या जागा मागण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसतील, आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल त्यातून जागेचं शेअरिंग फायनल होईल आणि ते अंतिम असेल. कार्यकर्ते मागणी करतात, मागणी करणे हा सर्वांचा अधिकार आहे. कोण कुठून निवडून येऊ शकतो हा महत्त्वाचा निकष असणार आहे. कोणी कोणत्या सीटवर लढावं यावर योग्य विचार केल्यानंतर निर्णय होईल."

विमानतळावर कार्यकर्त्यांशी संवाद : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या-ज्या विमानतळावर थांबतात कितीही कमी वेळ असेल तर ते बूथ प्रमुख शक्ती वॉरियर यासह कार्यकर्त्यांची भेट घेत असतात. आज त्यांनी नागपूरच्या 35 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ते नांदेडलाही पदाधिकारी कार्यकर्ते भेटणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच-सहा दौऱ्यात साधारणपणे 450 कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधल्याचं बावनकुळे म्हणाले.

आमच्या जीवनाचं सार्थक झालं : विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांची भेट घेतली, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, "आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. विश्व गौरव युगपुरुष नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना भेटतात. बूथ प्रमुखांना भेटतात, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात, तेव्हा ते बाहेर सांगतात आमच्या जीवनाचं सार्थक झालं. मोदींना भेटून बाहेर आलेला प्रत्येक कार्यकर्ता असाच म्हणतोय की, आमच्या जीवनाचं सार्थक झालं आम्ही धन्य झालो."

हेही वाचा :

  1. 'विकसित भारत २०४७' चा रोडमॅप काय आहे? पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दिल्यात महत्त्वाच्या सूचना
  2. वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले,...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.