ठाणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे विधानसभा निवडणूकच लढणार नव्हते असा खुलासा शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केलाय. राज्यातील 288 मतदार संघामध्ये प्रचार करण्यासाठी जावं लागणार आहे. प्रचार सभा, दौरा, रॅलीमुळं यावेळेस निवडणूक लढण्याची तयारी नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्याची माहिती, नरेश मस्के यांनी दिली.
चारही मतदारसंघात कामे करा : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढत आहोत. फक्त तुम्ही अर्ज भरा बाकी प्रचार आम्ही सांभाळू अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आणि एकनाथ शिंदे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. ठाण्यात प्रचारासाठी महायुतीच्या बैठकीमध्ये या संदर्भात नरेश मस्के यांनी खुलासा केला. ठाणे शहरातल्या चारही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी कामे करा त्यानंतर लागलीच दीड-दोन महिन्यांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळं लवकरच कार्यकर्त्यांना त्यात देखील संधी मिळणार असल्याची माहिती, नरेश मस्के यांनी या मेळाव्यात दिली.
महायुतीच्या प्रचारासाठी कंबर कसली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मतदारसंघामध्ये फारसे फिरत नसून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते महाराष्ट्रभर फिरत असून महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी का कार्यकर्त्यांनी सुरू केले काम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यग्र कार्यक्रमामुळं त्यांना प्रचारासाठी मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही म्हणून शिंदेंच्या
कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी संपूर्ण प्रचाराची जबाबदारी घेतली. कार्यकर्ते आणि नगरसेवक अहोरात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी कार्यरत आहेत.
हेही वाचा -