ETV Bharat / politics

संजय राऊतांचे भाऊ आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी, कारण काय? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप पूर्व मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्यानं काही काळ याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मतदान केंद्रावर संजय राऊतांचे भाऊ आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी, कारण काय?
मतदान केंद्रावर संजय राऊतांचे भाऊ आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी, कारण काय? (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 1:40 PM IST

Updated : May 20, 2024, 3:48 PM IST

मतदान केंद्रावर संजय राऊतांचे भाऊ आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी (ETV Bharat Reporter)

मुंबई Lok Sabha Election : महाराष्ट्रात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडतंय. या टप्प्यात राज्यात 13 जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भांडुप पूर्व मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात : दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप पूर्व येथील मतदार केंद्रावर खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी मतदान केलं. परंतु यापूर्वी 200 मीटरच्या बाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मतदारांना मतदान प्रक्रिया कशी आहे, हे समजावून सांगत सांगत होते. हे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मतदान केंद्राच्या परिसरात असं कृत्य करण्यास परवानगी नाही. यावर निर्बंध आहे, असं पोलिसांनी म्हणत तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावर आमदार सुनील राऊत यांनी आक्षेप घेत पोलिसांना याचा जाब विचारला. यावेळी पोलीस आणि सुनील राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

गाईडलाईन काय सांगते? : पोलीस आणि आमदार सुनील राऊत यांच्यात बराच वेळ वाद सुरु होता. मतदारकेंद्राच्या परिसरात 200 मीटर परिसरात कोणीही कसं मतदान करावं, कोणाला मतदान करावं, कोणत्या चिन्हाला मतदान करावं असं सांगण्यास परवानगी नाही असं पोलिसांनी म्हटलंय. यावर सुनील राऊत यांनी, "मतदान केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंत या गोष्टी करण्यास परवानगी नसते. परंतु, शंभर मीटरच्या बाहेर किंवा 200 मीटरच्या बाहेर कार्यकर्ते मतदान प्रक्रिया लोकांना समजावून सांगत होते. यावर तुम्ही आक्षेप कसा घेतला? आणि कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतलं?" या शब्दांत जाब विचारला. तसंच तुमची गाईडलाईन काय आहे ती सुद्धा दाखवा आणि आमच्या कार्यकर्त्यांना सोडा अशीही मागणी सुनील राऊत यांनी केली. परंतु वरिष्ठांच्या सूचना असल्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना सोडू शकत नाही असं म्हणत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा :

  1. दक्षिण मध्य मुंबईत मतदान केंद्रावर घोळ; मतदारांची नावं गायब, आयोगापुढे डोकं आपटायचं का, संतप्त मतदारांचा सवाल - Lok Sabha Election 2024
  2. लोकशाहीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी मुंबईत 'तारे जमीन पर'; कोणत्या सेलिब्रिटींनी केलं मतदान? वाचा संपूर्ण यादी - Lok Sabha Election 2024
  3. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात, कशी आहे मतदान केंद्रावर परिस्थिती? - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 20, 2024, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.