ETV Bharat / politics

"वडिलांचा पुतळासुद्धा उद्धव ठाकरेंनी सरकारच्या..."; राजकोट राड्यानंतर नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथील पुतळा कोसळला. या प्रकरणावरुन विरोधकांनी आंदोलन करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दरम्यान, आंदोलनावेळी राजकोट किल्ल्यावर ठाकरे समर्थक आणि राणे समर्थक आमनेसामने आले. या सर्व प्रकरणावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
उद्धव ठाकरे, नारायण राणे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 4:29 PM IST

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. बुधवारी राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गट व भाजपा नेते नारायण राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने धक्काबुक्की झाली.

राणेंची ठाकरेंवर टीका : याप्रसंगी खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारण्याची उघड धमकीसुद्धा दिली. यावरून वातावरण चांगलंच तापलंय. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

पावसाळी वातावरणामुळं पुतळा कोसळला : "हा पुतळा कसा कोसळला याची संपूर्ण चौकशी व्हावी," अशी मागणी नारायण राणेंनी केली. "पावसाळी वातावरणामुळं हा पुतळा कोसळला असावा. मात्र, याबाबत महाविकास आघाडीचे नेते राजकारण करत आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकारण सुरूय. आज आलेले (महाविकास आघाडी) सर्वजण मागील आठ महिने कुठे होते? उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ते राजकारण करतायेत. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या वडिलांचा पुतळासुद्धा सरकारच्या पैशातून उभा केला," अशी खोचक टीका राणे यांनी केली.

आम्ही चिरीमिरी करत नाही : "आम्ही किल्ल्यावर पाहणी करायला गेलो होतो. पाहणी करून परत येत होतो. तेव्हा ते लोक आमच्या अंगावर आले. आमच्याकडून काही झालं नाही. करायचं असेल तर आम्ही चिरीमिरी करत नाही," असं स्पष्टीकरण नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर झालेल्या गोंधळावर दिलं. "उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात एक तरी फॅक्टरी आणली का? एक तरी ब्रिज, पाटबंधारे धरण बांधले का? ५० लोकांना नोकऱ्या तरी दिल्या का?" असे प्रश्नही राणेंनी उपस्थित केले.

मोर्चे काढण्याशिवाय काय आहे? : "आम्हाला याबाबत कोणतंही राजकारण न करता परत पुतळा लवकरात लवकर उभारता येईल, त्यासाठी आमचे प्रयत्न असतील. हा पुतळा कोसळला याच्यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही राजकारण करायचं नाही," अशी भूमिका नारायण राणेंनी मांडली. "महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत. यांच्याकडं मोर्चे काढण्याशिवाय काही काम नाही," असा टोला मारत राणेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण मुद्दा उपस्थित केला. "शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात मंत्री होते, पण मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाहीत," असं टोला राणेंनी पवारांना लगावला.

हेही वाचा

  1. "महाराष्ट्र शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकात आंदोलन करणार", उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. "नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला", सिंधुदुर्गातील घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  3. "मालवणमधील 'तो' पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा..."; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप; वाद पेटणार? - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.