ETV Bharat / politics

"मला जर शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर...."; राज ठाकरेंनी थेटच सांगितलं - Raj Thackeray speech - RAJ THACKERAY SPEECH

Raj Thackeray Speech : मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudi Padwa Melava) 'शिवतीर्थ'वर पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख होण्याबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी भाष्य केलं.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 8:24 PM IST

Updated : Apr 10, 2024, 1:08 PM IST

मुंबई Raj Thackeray Speech : राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख होणार असल्याची चर्चा होती. त्यावर (MNS Gudi Padwa Melava) राज ठाकरे यांनी भाष्य केलं. मी कोणाच्याही हाताखाली काम करत नाही. मी मनसेचा अध्यक्ष आहे आणि राहणार. तुमच्या (कार्यकर्ते) जोरावर मी हा पक्ष स्थापन केला. त्यामुळं मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मला जर शिवसेनेचा पक्षप्रमुख व्हायचं जर असतं तर कधीच झालो असतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

निवडणूक आयोगावर ओढले ताशेरे : "जवळपास पाच वर्षानंतर निवडणुका होत आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुका होतील असं म्हणत होतो. पण त्या काही झाल्या नाहीत. त्यामुळं 2019 नंतर थेट 2024 ला निवडणुका होत आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणुकांच्या कामाला लावलं आहे. डॉक्टर काय मतदारांची नाडी तपासणार का? तसंच नर्सेस काय मतदारांची डायपर चेंज करणार का? डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकांच्या कामाला जाऊ नका," असं म्हणत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलंच झापलंय.

चॅनेलवाल्यांची उडवली खिल्ली : "मी अमित शाह यांना भेटणार तेव्हा वाट्टेल त्या बातम्या सुरू होत्या. अमित शाह यांना दिल्लीला भेटलो. अमित शाह आणि मी आम्हीच तिथे होतो. तुम्हाला कुठून कळलं काय बोललो? राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अशी बातमी त्यावेळी चालवली. अरे दुसऱ्या दिवशीची भेट होती. त्यामुळं मी आदल्या दिवशी दिल्लीत होतो," असं राज ठाकरे म्हणाले. 'मला असं वाटतं' अशी टॅगलाईनसुद्धा राज ठाकरे यांनी न्यूज चॅनेलवाल्यांना दिली.

माझ्याकडून वैयक्तिक टीका नाही : "मी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. जेव्हा अभिनेता अमिताभ बच्चन यांची भूमिका मला पटली नाही, तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली. पण मला काही पाहिजे होते म्हणून टीका केली नाही. मी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. आज जसे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे मोदींवर टीका करत आहेत, तशी मी कधी वैयक्तिक टीका केली नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

विधानसभेला हे कोथळा काढतील : पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की. "सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती एवढी भीषण आणि घातक झाली आहे की कोण कुठल्या पक्षात येतो आणि कोण कुठून जातो काही कळत नाही. राज्यातील राजकारणामध्ये चुकीचा कॅरम फुटला आहे. कोणाच्या सोंगट्य कोणाच्या भोxx जातात काही कळत नाही. आता एकमेकांवरती हाणामाऱ्या करत आहेत मग विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकाचा कोथळाही काढतील."

जगात भारत देश तरूण : "सध्या जगामध्ये सर्वाधिक तरुण देश कुठला असेल तर तो भारत देश आहे. त्यामुळे मोदींना माझी अशी विनंती आहे की सर्व सोडा पण तुम्ही तरुणाकडे लक्ष द्या. देशातील तरुण, तरुणी यांना रोजगार द्या...कारण हे देशाचे भविष्य आहेत आणि जगातील नंबर वन देश तरुण हा भारत देश आहे. अमेरिका, जपान कुठलाही नाही पण आपला देश तरुण आहे. या तरुणांनी पुढे येऊन देशासाठी काहीतरी केले पाहिजे. मोदींना माझे एवढे सांगणे आहे की या तरुणांसाठी काहीतरी करा... त्यासाठी ही निवडणूक ही देशाचं भविष्य ठरवणार आहे. देश खड्ड्यात जाणार ही वर येणार ही लोकसभा निवडणूक ठरवणार आहे."

हेही वाचा -

  1. राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरून घोषणा! मनसेचा महायुतीला मोदींच्या नेतृत्वासाठी बिनशर्त पाठिंबा - Raj Thackeray
  2. अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर, '21+17+10'; वाचा संपूर्ण यादी - lok Sabha election 2024
  3. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 10, 2024, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.