ठाणे Mira Bhayandar Shivsena Shakha : मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आणखी तीन कंटेनर शाखा उभारण्यात आल्या आहेत. रस्त्यालगत बेकायदेशीरपणे या शाखा उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनर शाखांना मनसेसह भाजपाकडून तीव्र विरोध केला जात आहे. कंटेनर शाखेला होणारा वाढता विरोध पाहता महापालिकेकडून याआधी काही शाखांवर कारवाई करण्यात आली होती. आता नव्यानं सुरू करण्यात आलेल्या शाखांमुळे हा वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
नागरिक, राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध : शिवसेना शिंदे गटाकडून नोव्हेंबर महिन्यात मीरा-भाईंदरच्या विविध रस्त्यांना लागून असलेल्या मोकळ्या जागेत कंटेनर शाखा सुरू करण्यात आल्या. यातील काही शाखा नागरिकांच्या रहदारीसाठी असणाऱ्या फुटपाथवर आणि नाल्यावर उभारण्यात आल्या आहेत. हे कंटेनर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध केला जात आहे.
मार्च महिन्यात पालिकेकडून काही शाखा हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात झालेला वाद हे या कारवाईमागचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाकडून आणखी तीन नवीन कंटेनर शाखा शाखा उभारण्यात आल्या आहेत. काशिमिरा येथील माशाचा पाडा, जनता नगर, धर्मवीर आनंद दिघे चौक, स्वर्गीय मीनाताई ठाकरे हॉल येथे कंटेनर शाखा उभारण्यात आल्या आहेत. या शाखांना सर्वसामान्य नागरिकांसह शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपा आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून विरोध केला जात आहे.
"मनपा प्रशासननं तत्काळ बेकायदेशीर पद्धतीनं उभारण्यात आलेल्या कंटेनर शाखेवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही देखील बेकायदेशीर पद्धतीनं कार्यालय रस्त्यावर कार्यालय उभारणार," असं मनसे, उपविभाग अध्यक्ष सचिन साळुंखे यांनी म्हटलंय.
कारवाई न झाल्यास तीव्र भूमिका : "फुटपाथ आणि रस्ते नागरिकांच्या रहदारीकरता मोकळे असायला हवेत. परंतु, त्यावरच शिवसेनेमार्फत शाखा उभारण्यात आल्या असून ते अयोग्य आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडं तक्रार करणार असून कारवाई न झाल्यास तीव्र भूमिका घेणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा, युवा मंडळ अध्यक्ष मंगेश मुळे यांनी दिलीय.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कंटेनर शाखा सुरू : "नागरिकांना अडचण निर्माण होणार नाही, ह्याचा विचार करुन शाखा उभारण्यात आल्या आहेत. तसंच शाखांचं पक्कं बांधकाम करण्यात आलं नसून त्या स्थलांतरित करता येतील, अशा आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्या उभारण्यात आल्या आहेत." असं शिवसेना, विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा
- "महिलांना आधी सुरक्षा द्या अन् नंतर त्यांना..."; पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Lakhpati Didi
- महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा; ठाकरेंचा "एवढ्या" जागांवर दावा? - Maha Vikas Aghadi Seat Sharing
- राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; शरद पवार, सुप्रिया सुळेंचं भरपावसात आंदोलन, उद्धव ठाकरेंचं मुंबईत आंदोलन - MVA Protest In Maharashtra
- आदित्य ठाकरेंच्या विरोधातही देणार उमेदवार; अत्याचार अगोदरही होते, निवडणूक आल्यानं विरोधक सरकारला बदनाम करताय का ?, राज ठाकरेंचा हल्लाबोल - Raj Thackeray Slams MVA Leaders