ETV Bharat / politics

सिंधुदुर्गात राणेंचा प्रचार सुरू; शिवसेनेचा अजूनही मतदारसंघावर दावा, तर मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून घेतली माघार - उदय सामंत - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील (Ratnagiri Sindhudurg Constituency) उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलाय.

Minister Uday Samant
मंत्री उदय सामं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 8:23 PM IST

प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग Lok Sabha Election 2024 : मतदानाला अवघे 34 दिवस बाकी असून सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट यांच्याकडून कोणतीही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. तरी आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरुवातीला कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर महायुतीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असूनसुद्धा त्यांनी या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला हजेरी लावली नाही.

मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून माघार : सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघातील (Ratnagiri Sindhudurg Constituency) उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही. या मतदारसंघावर आजही शिवसेनेचाच दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारी ही निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल असा दावा, मंत्री उदय सामंत यांनी कुडाळमध्ये माध्यमांशी बोलताना केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आज शिवसेना आणि भाजपाची समन्वय समितीची बैठक होती. मात्र, या बैठकीला उदय सामंत हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळं या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून कायम आहे. दरम्यान, किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रात्री उशिरा आपण माघार घेत असल्याचं स्टेटस ठेवलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते स्टेटस काढलं. अजूनही आमची आशा आहे की, हा मतदारसंघ निश्चितपणे शिवसेनेकडेच राहील अशा पद्धतीचा दावा सुद्धा उदय सामंत यांनी केलाय.

संघटनात्मक आढावा बैठक : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारी जरी जाहीर झाली नसली तरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर आपला प्रबळ दावा ठोकला आहे.

हेही वाचा -

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा दावा आम्ही सोडला नाही; उदय सामंतांच्या खुलाशानं महायुतीत 'घुमशान' - Lok Sabha Election 2024
  2. महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, उदय सामंत घेणार गडकरी, फडणवीसांची भेट - Lok Sabha elections
  3. ट्वीट केलं म्हणजे जागा त्यांची झाली असं होत नाही; उदय सामंत यांचा नारायण राणे यांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.