ETV Bharat / politics

"छगन भुजबळ 'अपशकुनी', पक्षाचं वाटोळं केलं"; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 1:57 PM IST

Updated : Aug 13, 2024, 2:18 PM IST

शिर्डी(अहमदनगर) Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मराठा आरक्षण रॅली सुरू आहेत. या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये झाला. अहमदनगर येथील रॅली संपवून नाशिकला जात असताना जरांगे पाटील यांनी शिर्डीत साई बाबांचं (Shirdi Sai Baba) दर्शन घेतलं.

प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील (ETV BHARAT Reporter)

छगन भुजबळांवर निशाणा : "छगन भुजबळ यांची सुरक्षा वाढवली. पण, आम्ही काहीच करणार नाहीत. ते घराच्या बाहेर खुर्चीवर बसले तरी त्यांच्याकडं आम्ही पाहणारसुद्धा नाहीत. ते अपशकुनी असून, त्यांच्यामुळं त्यांच्या पक्षाचं वाटोळं झालं आहे," असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं साई समाधीचं दर्शन (ETV BHARAT Reporter)

प्रवीण दरेकरांना मारला टोला : "प्रवीण दरेकर हे मागच्या दारातून आमदार झाले. मराठ्यांच्या मतांवर ते निवडून आले आहेत. त्यांनी १२ महिने आंदोलन करून दाखवावं. माझं, समाजाचं काय म्हणणं आहे हे त्यांना कधीच कळणार नाही. खेड्यात येऊन त्यांनी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. ते फडणवीसांची भाकरी खातात म्हणून मराठ्यांशी गद्दारी करणं सुरू आहे," अशा शब्दात जरांगेंनी दरेकरांनाही टोला लगावला.

शिर्डीत साईबाबांचं घेतलं दर्शन : मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी शिर्डीत दाखल झाली होती. आज सकाळी त्यांनी साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं."मराठा आरक्षण देण्यासाठी या सरकारला सदबुद्धी द्यावी," अशी प्रार्थना त्यांनी साई चरणी केली. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं जरांगे यांचा शाल, साई मूर्ती देत सन्मान करण्यात आला.

हेही वाचा -

  1. नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटलांची रॅली; 'भुजबळ फार्म'ची सुरक्षा वाढवली, शाळांना सुट्टी जाहीर - Manoj Jarange Patil Rally Nashik
  2. शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन हे देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप - Manoj Jarange Patil
  3. "माझ्याविरोधात बोलले त्यांना मागच्या..."; मनोज जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना टोला - Maratha OBC Reservation

Last Updated : Aug 13, 2024, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.