ETV Bharat / politics

भाजपा अजित पवारांना सत्तेपासून दूर करणार; भाजपात आत्मचितंन सुरू - महेश तपासे - Ajit Pawar News - AJIT PAWAR NEWS

Ajit Pawar News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर' (Organiser) मधून भाजपाला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे (Mahesh Tapase) यांनीही भाजपाला लक्ष्य केलं आहे.

PM Narendra Modi and Ajit Pawar
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 7:00 PM IST

मुंबई Ajit Pawar News : लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याचं खापर भाजपाची मातृसंस्था असलेल्या आरएसएसच्या मुखपत्र 'ऑर्गनायझर' (Organiser) मधून भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार यांना सोबत घेतल्यानं महाराष्ट्रात फटका बसल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळं विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा अजित पवार यांना सत्तेतून बाहेर काढेल असा खळबळजनक दावा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलाय.

प्रतिक्रिया देताना महेश तपासे (ETV BHARAT Reporter)

अजित पवार यांच्यावर निशाणा : भाजपाची मातृसंस्था असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर' मधून भाजपाला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. देशातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. याविषयी कारणांचा उल्लेख करताना अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी केली असून त्याचा फटका पक्षाला बसला आहे. अजित पवार यांना घेण्याचं कारण काय, असा थेट सवाल लेखात विचारण्यात आलाय. भाजपानं त्यांच्यासोबत हातमिळवणी केल्यामुळं भाजपाचे कार्यकर्ते दुखावले असल्याचं देखील लेखात नमूद करण्यात आलंय.

अजित पवार यांना सरकार मधून काढणार : अजित पवार यांना भाजपासोबत घेणं हे चूक असल्याचा दावा, भाजपाच्या मातृसंस्था असलेल्या आरएसएसनं केलाय. अजित पवार यांच्यावर सर्वात पहिले आरोप करणारा पक्ष कोणता तर भाजपा. अजित पवार यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करणारे नेते कोण तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, देशातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करप्ट पार्टी आहे असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. अशा प्रकारचा आरोप केला असताना देखील भाजपानं अजित पवार यांना आपल्या सोबत घेऊन सरकारमध्ये स्थान दिलं. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशात आणि महाराष्ट्रात फटका बसला असा दावा, आरएसएसच्या मुखपत्रातून करण्यात आलाय. याचा अर्थ आता स्पष्ट झाला आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा अजित पवार यांना सरकारमधून बाहेर काढून त्याच्यासोबत युती करायची की नाही, याबाबत भाजपात आत्मचिंतन सुरू झालं असेल, असा खळबळजनक दावा महेश तपासे यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपानं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाच्या मुखपत्रातून भाजपाला 'घरचा आहेर' - RSS Mouthpiece Criticize To BJP
  2. चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री - Chandrababu Naidu
  3. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ? - Tensions in MVA Over MLC polls

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.