ETV Bharat / politics

'रासप'ला महायुतीच्या बैठकीत निमंत्रण नाही; महादेव जानकर वेगळ्या विचारात? - महादेव जानकर

Mahayuti Meeting in Pune : आज पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक होणार आहे. मात्र महादेव जानकर यांच्या रासपला या बैठकीचं निमंत्रण मिळालेलं नाही.

'रासप'ला महायुतीच्या बैठकीत निमंत्रण नाही; महादेव जानकर वेगळ्या विचारात?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 12:07 PM IST

पुणे Mahayuti Meeting in Pune : देशभरात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागलाय. भारतीय जनता पक्षानं लोकसभेसाठी पहिली यादी देखील जाहीर केलीय. पुण्यात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या बारामती, पुणे व शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, लोकजनशक्ती पार्टी, शेतकरी संघटना, शिवसंग्राम व इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पण असं असलं तरी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला आजच्या या बैठकीचं निमंत्रण न दिल्यानं महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष वेगळ्या विचारात असल्याचं सांगितल जातंय.

माढा मधून जानकरांना उमोदवारी : मागील काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीची साथ सोडत महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनी महादेव जानकर जर आमच्या सोबत असल्यास त्यांना मी माझी लोकसभेची जागा द्यायला तयार असल्याचं सांगितलं होतं. याचा अर्थ माढामधून जानकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता असून तशी तयारी महाविकास आघाडीनं केलीय. पण अजूनही याबाबत आपली भूमिका जानकर यांनी स्पष्ट केलेली नाही.

बैठकीचं निमंत्रण नाही : पुण्यात आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे, बारामती, शिरुर या लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय, लोकजनशक्ती पार्टी, शेतकरी संघटना, शिवसंग्राम व इतर पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीला रासप निमंत्रण देण्यात आलेलं नसल्यानं त्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत. याबाबत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आमच्या प्रतिनिधीनं दूरध्वनीवर विचारलं असता, आम्हाला कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. म्हणून आमचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. सुप्रिया सुळेंनी स्वत: जाहीर केली बारामतीतून उमेदवारी? 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची जोरदार चर्चा
  2. वर्धा लोकसभा मतदारसंघ : 'महात्मा गांधींच्या कर्मभूमी'त तिसऱ्यांदा कमळ फुलणार? काय असेल लोकसभेचं समीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.