मुंबई- महायुती सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षात महायुती सरकारनं खूप काम केली असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. "पंतप्रधान मोदी देशाची प्रगती करत आहेत. राज्याच्या विकासात पंतप्रधान पाठिशी आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढं कामं केलं, तेवढं काम काँग्रेसला ५० ते ६० वर्षात करणे शक्य झाले नाही. ठाकरे गटाला काँग्रेसच्या मतांची सूज आहे. ही सूज जास्त दिवस राहणार नाही."
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "खरेतर 2 वर्षे म्हणजे खूप कमी काळ आहे. पण, महायुती सरकारनं खूप कामे केली आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाची कामे थांबली होती. ही कामे सुरू करण्यात आली. त्यांनी बंद केलेले मराठवाडा ग्रीड प्रकल्पदेखील पूर्ववत केला."
पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " मोदी सरकारच्या काळात देशाचा विकास वेगानं आहे. देशाची जगभरात प्रतिष्ठा वाढली आहे. पंतप्रधान मोदींमुळे भारताचा मान जगभरात उंचावला आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी बोलतात, तेव्हा जग ऐकते. हे फक्त पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले. त्यांनी आयुष्य सर्वस्व देशासाठी वाहून घेतलेलं आहे. एकही दिवस सुट्टी न घेणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान यांच्या प्रयत्नामुळे भारत हा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला. आपली अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर होईल, असा विश्वास आहे. भारत हा ५०० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. पंतप्रधान मोदी हे भारत महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र योगदान देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्र भक्कम साथ देईल, कारण त्यांच्याकडं विकासाची दृष्टी आहे. फक्त विकास, विकास आणि विकास हेच त्यांचे ध्येय आहे. येत्या पाच वर्षात असा विकास होईल की जग पाहत राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कामातून उत्तर दिले- "आम्ही अधिवेशनात योजनांची घोषणा केल्यावर त्यांचे चेहरे फिक्के पडले आहेत. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. सामान्यांसाठी नाही तर कुणासाठी योजना लागू करणार? ही निवडणुकीसाठी योजना नाही. त्यासाठी गेली काही महिने तयारी सुरू होती. विरोधी पक्ष आम्हाला चांगले कसे म्हणतील? ते हरणार आहेत. हे घटनाबाह्य सरकार असल्याचा आरोप केला. मात्र, आम्ही आरोपाला उत्तर देणार नाही, कामातून उत्तर दिले," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
खरी शिवसेना कुणाची? शिवसेना ठाकरे पक्षाकडून महायुती सरकारवर 'खोके सरकार' असा आरोप होतो. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, " ते रात्रंदिवस पैसे पाहतात. खोके सरकार म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? त्यांना कंटेन्टर लागत असल्याचा राज ठाकरेंनी आरोप केला होता. आपण वेळ आल्यावर हे कंटेनर कुठून येतात आणि जातात हे सांगू," असा त्यांनी इशारा दिला. "आम्ही दोन हातांनी देणारे आहोत. 'लेनेवाला नही देनेवाला बँक' आहे. पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्यानं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे."
- खरी शिवसेना कुणाची, यावर एकनाथ शिंदे म्हणाले, " लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट आणि मतांची टक्केवारी हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोण आणि खोटी कोण हे लोकांना कळाले आहे. त्यांना उठता-बसता खोके लागतात. त्यांनी फक्त पैसे जमा केले. त्यांची लखनौमध्ये २०० एकर जागा आहे."
हेही वाचा-