ETV Bharat / politics

महायुतीत पडणार खिंडार! अमरावती मतदार संघावर भाजपाचा दावा - Maharashtra Assembly Election 2024

काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांची उमेदवारी जवळपास निश्चित असतानाच भाजपाच्या जगदीश गुप्ता यांनी अमरावती विधानसभा मतदार संघावर दावा ठोकलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Amravati Assembly Constituency
अजित पवार, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)

अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच इच्छुक उमेदवारांनी तयारी करण्यास सुरूवात केली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांच्या अडचणीत आल्या आहेत. माजी मंत्री आणि भाजपा नेते जगदीश गुप्ता यांनी या मतदार संघात उमेदवारीसाठी रणशिंग फुंकलं आहे.

महायुतीचा उमेदवार मीच : भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि (राष्ट्रवादी काँग्रेस) अजित पवार गट यांची महायुती विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आव्हान देणार, अशी परिस्थिती दिसत असली तरी अमरावतीत महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि भाजपा नेते जगदीश गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली. अमरावती विधानसभा मतदार संघ महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटणार, असं जवळपास निश्चित असतानाच जगदीश गुप्ता यांनी महायुतीचा उमेदवार मीच असणार, असं जाहीर करून प्रचाराला सुरूवात केलीय. 20 वर्षानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे जगदीश गुप्ता यांची राजकारणात असणारी सक्रियता आणि येणाऱ्या काळातील वाटचाल या संदर्भात त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

भाजपा नेते जगदीश गुप्ता यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

अमरावतीची जागा सोडणार नाहीत : "खरंतर एखाद्या जागेचं महात्म्य असतं. अमरावती हे विभागीय शहर आणि पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं केंद्र आहे. पश्चिम विदर्भातील संपूर्ण संघटनात्मक काम हे अमरावतीमधून चालतं. यामुळे अमरावती शहराचं महत्व अधिक आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे नेते अमरावतीची जागा सोडणार नाहीत, असं जगदीश गुप्ता म्हणाले.

अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व नाही : आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अमरावतीची जागा भाजपासाठी महत्त्वाची आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्वच नाहीय. त्यामुळं ही जागा भाजपाला मिळणार असून आम्ही तयारी सुरू केली असल्याचं जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीनंतर जनतेत चीड : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर जो काही गोंधळ उडाला. विजयाचा हैदोस घातला गेला. त्या संपूर्ण उन्मादाची प्रचंड चीड अमरावतीकरांमध्ये आहे. अमरावतीत असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी मतदार जागृत आहेत आणि आमचे कार्यकर्ते देखील कामाला लागले असल्याचं जगदीश गुप्ता म्हणाले.

अमरावतीत प्रथमच भाजपाचा झेंडा : जगदीश गुप्ता यांनी 1990 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज पुष्पा बोंडे आणि 1995 च्या निवडणुकीत देवीसिंह शेखावत यांचा पराभव करत अमरावतीत प्रथमच भाजपाचा झेंडा फडकवला. 1995 मध्ये राज्यात आलेल्या युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते आणि त्याच काळात त्यांनी अमरावतीचं पालकमंत्री पद भूषवलं. पुढे 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुनील देशमुख यांनी जगदीश गुप्ता यांचा पराभव केला. यानंतर 2006 ते 2012 पर्यंत ते विधान परिषदेवर निवडून गेलेत.

कार्यकर्त्यांसोबत कायम : "मी राजकारणात सक्रिय नव्हतो, असं कोणी म्हणू शकत नाही कारण मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत कायम होतो. महापालिकेच्या निवडणुकीत माझी भूमिका महत्त्वाची होती. आता लोकसभा निवडणुकीत देखील माझा सहभाग होता. प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत माझा खारीचा वाटा राहिला." असं जगदीश गुप्ता म्हणाले.

अमरावतीत होणार रंगतदार लढत : 2019 मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघात सुनील देशमुख यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात होते. अमरावतीची जागा काँग्रेसची असल्यानं 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा कोडके काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी सुनील देशमुख यांचा जवळपास 20 हजार मतांनी पराभव केला. आता सुनील देशमुख पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतले असून ते काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झालंय. सुनील देशमुख आणि सुलभा खोडके यांची अल्पसंख्यांकांवर चांगली पकड असून आता 2024 च्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांपैकी अल्पसंख्यांक मतदार कोणाकडे वळतात यावर बरंच काही अवलंबून आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं आम्हाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी अल्पसंख्याकांमधूनही होत असल्यानं अमरावतीच्या राजकारणात चांगलाच ट्विस्ट निर्माण आलाय. अमरावतीतील भाजपचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे जगदीश गुप्ता यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्यानं अमरावती विधानसभा मतदारसंघात यावेळी रंगतदार लढत पाहायला मिळणार.

हेही वाचा

  1. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता खात्यावर जमा - PM Kisan Samman Nidhi
  2. पंतप्रधान मोदींकडून नंगारा भवनाचं उद्घाटन, बंजारा समाजाच्या 'काशी'त वाजवले नगारे - PM NARENDRA MODI SPEECH IN WASHIM
  3. राहुल गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल; शिवरायांचा पुतळा पडण्याचं सांगितलं कारण - Rahul Gandhi Reach At Kolhapur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.