ETV Bharat / politics

काँग्रेसची 8 मतं फुटली; संतापलेले नाना पटोले म्हणाले, "बेईमान लोकांना दाखवणार बाहेरचा रस्ता" - MLC Election Results - MLC ELECTION RESULTS

Congress MLA Cross Voting : विधानपरिषदेची निवडणूक शुक्रवारी (12 जुलै) पार पडली असून 11 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्यानं शेकापचे शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

Maharashtra Vidhan Parishad Election Results Nana Patole angry over congress MLA cross voting
नाना पटोले (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 7:36 AM IST

मुंबई Congress MLA Cross Voting : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या तीनपैकी दोन उमेदवारांचा विजय झाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले. हा पराभव महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असून काँग्रेसची मतं फुटल्यानं आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. तर ज्या लोकांनी पक्षाशी बेईमान केली, अशा लोकांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)
पराभवानं जयंत पाटील संतप्त : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला असून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचाही विजय झालाय. परंतु शरद पवार गटाचे पुरस्कृत आणि शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झालाय. काँग्रेसच्या अतिरिक्त 12 मतांपैकी एकही मत जयंत पाटील यांना भेटलं नाही. पहिल्या पसंतीत जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दुसऱ्या पसंतीच्या मतानंतर त्यांना एकूण बारा मतं मिळाली. यामध्ये काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. या कारणानं संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी मतमोजणी सुरू असतानाच विधान भवनातून काढता पाय घेतला. यावेळी माझी 12 मतं मला मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अशोक चव्हाण यांच्या संपर्कात काँग्रेसचे काही आमदार : काँग्रेसचे जे आमदार फुटले आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांच्यावर काँग्रेसनं कडक कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तर दुसरीकडं यासंदर्भात प्रतिक्रिया देत नाना पटोले म्हणाले की, "2022 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. त्यादरम्यान ज्या काँग्रेस आमदाराची मतं फुटली, त्यांच्यावर यंदा काँग्रेसनं ट्रॅप ठेवला. म्हणून आता अशा बेईमान आणि बदमाश लोकांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी कुठल्याही समितीची गरज नाही. आता केवळ पक्षश्रेष्ठींना याबाबत सविस्तर माहिती देऊन काँग्रेस पक्षातून गद्दार आमदारांची हकालपट्टी केली जाईल," असंही नाना पटोले म्हणाले. तसंच माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यानंतर अजूनही काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -

  1. विधानपरिषद निवडणुकीत शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचे वाजले 'बारा'; कोणत्या पक्षाची मतं फुटली? - MLC Election Results 2024
  2. लाइव्ह विधान परिषद निकाल : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर विजयी - Maharashtra Breaking news
  3. विधान परिषद निवडणुकीसाठी 'हॉटेल डिप्लोमसी'; मतांची फाटाफूट टाळण्यासाठी राजकीय पक्षांची 'धावपळ' - MLC ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.