मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
Live updates-
- शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोली लोकसभा जागेवर उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेने 28 मार्च रोजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तथापि, त्यांच्या उमेदवारीला महायुतीमधून विरोध झाला आहे. यातत भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे, असा दावा शिवसेनेच्या एका नेत्यानं केला आहे. हिंगोलीत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार आहे.
- चंद्रपूरमध्ये काँग्रेसला निवडून देण्याची चूक मतदार पुन्हा करणार नाहीत, असा दावा भाजपाचे उमेदवार तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आमदार मुनगंटीवार म्हणाले, विरोधकांच्या बाजूनं सहानुभूतीनं मते जाण्याची शक्यताही त्यांनी नाकारली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचे अल्पशा आजारानं निधन झाले.
- माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर एक्स मीडियावर पोस्ट केली आहेत. त्यांनी पोस्टमध्ये की, बुधवारी पक्षाकडं राजीनामा दिल्यानंतर पक्षातून काढण्यात आलं. काँग्रेसची अशी तत्परता पाहून आनंद झाला. आज सकाळी साडेअकरा ते बारा वाजता माहिती देणार आहे.
- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा मुद्दा अजूनही निकाली लागला नाही. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगली जागेवरून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढविणार असल्याच स्पष्ट केलं. आम्ही आघाडीत असताना आघाडीचा धर्म पाळल्याचही त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे कसे आहे वेळापत्रक?
- नामांकन : 28 मार्च 2024
- उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 4 एप्रिल 2024
- नामांकनांची छाननी : 5 एप्रिल 2024
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 8 एप्रिल 2024
- मतदानाचा दिवस : 26 एप्रिल 2024
- निकाल: 4 जून 2024
दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांचा समावेश
- अमरावती
- वाशीम
- यवतमाळ
- अकोला
- परभणी
- नांदेड
- हिंगोली
- बुलढाणा
भाजपाचे बूथ विजय अभियान : भाजपानं बुधवारपासून राज्यात सात दिवसांची विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक बूथमध्ये किमान 370 अधिक मते जिंकण्यांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी ठाण्यात माहिती दिली की, "विविध मतदारसंघांमध्ये 'बूथ विजय अभियान' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पारंपरिकपणे भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल." महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यामधून निवडणूक लढवणार? : सातारा लोकसभेसाठी निवडणूक लढवण्याकरिता काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तयारी दाखविली आहे. मात्र, ही निवडणूक 'घड्याळ' नव्हे तर 'हात' या चिन्हावर लढविण्यास तयार असल्याचं सांगितलं. सातारा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढविण्यास नकार दिला.
जागावाटप अद्याप रखडलेल्या अवस्थेतच : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मतैक्य झालेले नाही.
हेही वाचा-