ETV Bharat / politics

भिवंडीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांचा अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल - Lok Sabha election phase 5 voting - LOK SABHA ELECTION PHASE 5 VOTING

Lok Sabha election phase 5 voting
Lok Sabha election phase 5 voting
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 6:56 AM IST

Updated : May 20, 2024, 6:25 PM IST

18:24 May 20

भिवंडीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांचा अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल

भिवंडी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीस अधिकाऱयाला वापरले अपमानास्पद शब्द

भिवंडी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या अंजूर फाटा चौगुले कॉलेज या ठिकाणी घडला प्रकार

तैनात असलेल्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना एकेरी भाषेत दिला दम

कपिल पाटील यांच्या अशा या बेताल वागण्याबद्दल उपस्थित मतदारांनी नाराजी व्यक्त केली

17:51 May 20

राज्यात पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

भिवंडी- 48.89 टक्के

धुळे- 48.81 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

कल्याण - 41.70 टक्के

मुंबई उत्तर - 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य - 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व - 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 टक्के

मुंबई दक्षिण - 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

नाशिक - 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

ठाणे - 45.38 टक्के

17:42 May 20

पाच वाजेपर्यंत राज्यात ४८.६६ टक्के मतदान

दिंडोरीत सर्वाधित ५७. ०६ टक्के

कल्याणमध्ये ४१.७० टक्के मतदान

17:28 May 20

सलमान खान, निता अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : अभिनेता सलमान खान, निता अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसंच सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही यावेळी निता अंबानी यांनी केलं.

17:15 May 20

निवडणूक आयोगाच्या कारभारावर आमदार जितेंद्र आव्हाड भडकले

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा भागात मतदार तासंतास मतदानासाठी ताटकळलेले पाहायला मिळाले. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मतदारांचा मोठा रोष पाहायला मिळाला. या प्रकाराने वैतागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अनेक तास उभे राहिल्यामुळे बसायला देखील व्यवस्था नसल्याने महिला आणि जेष्ठ नागरिकांना मोठा त्रास झाल्याचे दिसले.

17:07 May 20

संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी चांगली येईल, रामदास आठवले यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : रामदास आठवले यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी सांगितले आहे की, मुंबईमध्ये आणि उपनगरात 13 जागांवरती निवडणुका आहेत. लोकांचा प्रतिसाद आहे. लोकं वोटिंग करण्यासाठी येत आहेत. संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी चांगली येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांनी चांगल्या प्रकारचा प्रचार केलेला आहे आणि इंडिया आघाडीवर एक प्रकारे जबरदस्त चांगल्या पद्धतीने वार केले आहेत.

16:16 May 20

अभिनेता शाहरुख खाननं कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने गौरी खान आणि आर्यनसोबत वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शाहरुखने मतदान केले असून शाहरुखच्या चाहत्यांनी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती.

15:38 May 20

अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

कलम 188 नुसार शांतिगिरी महाराजांवर निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी मतदान केंद्रात असलेल्या ईव्हीएम मशीनला घातला होता फुलाचा हार

14:50 May 20

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी दक्षिण मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर सेंट ज्युड हायस्कूल, जनकल्याण नगर, मालाड-पश्चिम येथील मतदार केंद्रावर आमदार अस्लम शेख यांनी मतदानाचा हक्क बजावला.

14:06 May 20

देवयानी फरांदे आणि वसंत गीते यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले

नाशिकमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि उबाठा गटाचे माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यकर्ते एकमेकाशी भिडले आहेत. भद्रकाली हद्दीत मतदान केंद्रावरील घटना आहे. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा दिल्यानंतर

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

13:44 May 20

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक - २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण - २२.५२ टक्के

ठाणे - २६.०५ टक्के

मुंबई उत्तर - २६.७८ टक्के

मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१ टक्के

मुंबई उत्तर - पूर्व - २८.८२ टक्के

मुंबई उत्तर - मध्य - २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण - मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के

13:28 May 20

बोरिवलीतील मतदान केंद्रावर नागरिकांची गैरसोय, आमदार प्रकाश सूर्वेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं

बोरिवली पश्चिमेतील सायली महाविद्यालय या मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच मतदारांची गैरसोय होत आहे. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते उष्णतेपर्यंत अशा समस्या ज्या आहेत त्या या मतदारांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळाले.

13:05 May 20

उद्योगपती रतन टाटा, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे मतदान

उद्योगपती रतन टाटा, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज मतदान केले.

12:05 May 20

भारती पवार यांनी केलं मतदान

केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती प्रवीण पवार यांनी नाशिक येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

12:05 May 20

रश्मी ठाकरे यांनी केलं मतदान

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केलं.

11:53 May 20

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

मुंबई-राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

धुळे- १७.३८ टक्के

दिंडोरी- १९.५० टक्के

नाशिक - १६.३० टक्के

पालघर- १८.६० टक्के

भिवंडी- १४.७९ टक्के

कल्याण - ११.४६ टक्के

ठाणे - १४.८६ टक्के

मुंबई उत्तर - १४.७१ टक्के

मुंबई उत्तर - पश्चिम - १७.५३ टक्के

मुंबई उत्तर - पूर्व - १७.०१ टक्के

मुंबई उत्तर - मध्य - १५.७३ टक्के

मुंबई दक्षिण - मध्य- १६.६९ टक्के

मुंबई दक्षिण - १२.७५ टक्के

11:07 May 20

नाना पाटेकर, सुनील शेट्टीसह गोविंदानं केलं मतदान

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेता सुनील शेट्टी, गोविंदा यांनी मतदान केलं.

10:47 May 20

नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत-एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वागळे इस्टेट परिसरातील नेपच्यून पार्क मतदान केंद्रावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले. यावेळी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पत्नी लता शिंदे हे सोबत होते. त्यांनी मतदान केल्यानंतर महायुतीच्या एमएमआरमधील 10जागा निवडून येतील असा आत्मविश्वास वक्त केला. नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत, असे सांगत मतदानाचा टक्का ठाण्यात वाढेल असे त्यांनी सांगितले. तरुणांनी मतदानासाठी बाहेर पडा मतदान करण्याचे आवाहन केले आहे

09:44 May 20

पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

मुंबई- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

धुळे- ६.९२ टक्के

दिंडोरी- ६.४० टक्के

नाशिक - ६.४५ टक्के

पालघर- ७.९५ टक्के

भिवंडी- ४.८६ टक्के

कल्याण - ५.३९ टक्के

ठाणे - ५.६७ टक्के

मुंबई उत्तर - ६.१९ टक्के

मुंबई उत्तर - पश्चिम - ६.८७ टक्के

मुंबई उत्तर - पूर्व - ६.८३ टक्के

मुंबई उत्तर - मध्य - ६.०१ टक्के

मुंबई दक्षिण - मध्य- ७.७९ टक्के

मुंबई दक्षिण - ५.३४ टक्के

ही सर्व अंदाजित आकडेवारी आहे.

09:44 May 20

कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 5.39 टक्के मतदान

ठाणे- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 5.39 टक्के मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

140 अंबरनाथ – 5.89 टक्के

141 उल्हासनगर – 3.27 टक्के

142 कल्याण पूर्व – 8.61 टक्के

143 डोंबिवली – 7.00 टक्के

144 कल्याण ग्रामीण – 3.51 टक्के

149 मुंब्रा कळवा – 4.97 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

09:13 May 20

मुंबई उत्तर मध्य लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी केलं मतदान

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांची लढत माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याविरोधात आहे.

08:55 May 20

ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी मतदानाकरिता लोकांना दिली प्रेरणा, म्हणाल्या,...

ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले. त्या म्हणाल्या, "मी योग्य उमेदवाराला मतदान केलं आहे. मी घरातून मतदानाचा पर्याय निवडला नाही. लोकांनी बाहेर पडून मतदान करावे लोकांना प्रेरणा मिळावी आणि बाहेर पडून मतदान करावे, याकरिता मतदानकेंद्रावर येऊन मतदान केलं."

08:54 May 20

लोकसभा निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बजाविला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सेंट ॲनिज हायस्कूल, मादाम कामा रोड, मुंबई येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

08:02 May 20

मंदिरात जाऊन उज्जवल निकम हे मतदान करणार

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम हे आधी मंदिरात जाऊन मतदान करणार आहे. त्यानंतर मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेट देईन. मतदान हा लोकशाहीत एक सण असून सर्व मुंबईकर मतदानाचा हक्क बजावतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

07:52 May 20

दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं मतदान

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मतदान केले. थोड्याच वेळापूर्वी शिवेसनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदान केलं.

07:52 May 20

अमोल कीर्तिकर सहपत्नीक मतदान केंद्रावर दाखल

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर सहपत्नीक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.

07:51 May 20

चित्रपटजगतातील अनेक दिग्गज स्टार्स आपले मत देण्यासाठी मुंबई बांद्रा सेंट ॲन्स शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. कपूर कुटुंबातील बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ही मतदान केले.

07:45 May 20

मुंबई पोलीस सतर्क, मतदान करण्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले, "हा खूप मोठा दिवस आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मतदार मतदान करत आहेत. मी मुंबईतील सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतो. मुंबई पोलीस सतर्क आहेत.

07:43 May 20

अभिनेता फरहान अख्तर, दिग्दर्शख झोयासह अक्षय कुमारनं केलं मतदान

अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान आज सकाळी मतदान केलं. मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या बोटावर मतदान केल्याची शाईची खूण दाखविली. अक्षय कुमार म्हणाले, माझा भारत विकसित आणि सामर्थ्यवान व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी ते लक्षात घेऊन मतदान केलं. ज्यांना जे योग्य वाटेल त्यालाच मतदान करावे. मला वाटते की मतदान चांगले होईल.

07:37 May 20

हजार ते दीड हजार लोक बोगस मतदान करणार, राजन विचारे यांची प्रशासनाला माहिती

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या या निवडणुकीमध्ये कोपरी पाच पाखाडी वागळे या भागात हजार ते दीड हजार लोक बोगस मतदान करणार असल्याची माहिती राजन विचारे यांनी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला दिली आहे. हे प्रकार रोखण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना सतर्क राहून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

07:36 May 20

भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मतदानाचा बजाविला हक्क

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी मतदानाचा बजावला हक्क बजाविला आहे.

07:18 May 20

उद्योगपतीसह शिवसेनेच्या उमेदवारानं केलं मतदान, मुंबईकरांमध्ये मतदानाकरिता उत्साह

मुंबईत आज मत उद्योगपती अनिल अंबानी यांनी मतदान केले. त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदान केले. मतदानाला सुरुवात होताच उद्योगपती आणि लोकसभेच्या उमदेवारांनी मतदान केल्यानं मतदारांचा उत्साह वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

07:12 May 20

उद्योगपती अनिल अंबानी मतदानाकरिता रांगेत उभे

उद्योगपती अनिल अंबानी हे मतदान सुरू होण्याची वाट पाहत आहे. मतदान करण्यासाठी लांबलचक रांगेत अंबानी उभे राहिले आहेत.

07:11 May 20

विकास करणाऱ्याला तुमचं द्यायला हवं-यामिनी जाधव

दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव म्हणाल्या, " काम करणाऱ्या आणि विकास करणाऱ्याला तुमचं द्यायला हवं, असा संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छिते. तुम्हाला मतदान करण्याचा आणि तुमचा मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे." शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी त्यांच्याशी लढत होत आहे.

06:37 May 20

राज्यातील १३ मतदारसंघासाठी मतदान

मुंबई- मुंबई आणि उपनगरांतील निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील 13 मतदारसंघाकरिता मतदान होणार आहे. तर मुंबईतील चार मतदारसंघात ७३५३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मात्र, मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही, असे निवडणूक निर्णय जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदारांसाठी विविध उपाययोजना- मुंबईतील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, एअर कुलर तसेच पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे क्षीरसागर यांनी सांगितले. तर मतमोजणीसाठी 4 जून 2024 रोजी नेस्को, गोरेगाव आणि उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : May 20, 2024, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.