ETV Bharat / politics

बीड, परभणीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद; विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची राजकारण करु नये अशी अपेक्षा - MAHARASHTRA ASSEMBLY WINTER SESSION

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाना पटोले यांनी परभणी आणि बीड येथे झालेल्या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं.

MAHARASHTRA ASSEMBLY WINTER SESSION
देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2024, 4:56 PM IST

Updated : Dec 16, 2024, 5:24 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा रविवारी (15 डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार झाला. आजपासून (16 डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी बीड आणि परभणी येथे झालेल्या घटनेवरून दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला जाब विचारत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सडेतोड उत्तर देत, सत्ताधाऱ्यांची यावर चर्चा करण्याची पूर्ण तयारी असून विरोधकांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये, अशी विनंती केली.

सरकारनं चर्चा करावी : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू या दोन्ही घटनांवरून विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारनं सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी, अशी मागणी लावून धरली. तसंच ईव्हीएममधून निवडून आलेल्या सरकारनं राजकीय हत्यासत्र सुरू केलं आहे का? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. "सभागृहात शोक प्रस्ताव असल्याकारणानं या विषयावर चर्चा करता येणार नाही," असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसंच या प्रश्नांवर सरकारची चर्चा करण्याची तयारी असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याप्रसंगी सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले (Source - ETV Bharat Reporter)

चौकशी करून त्वरित कारवाई करावी : दुसरीकडे, विधान परिषदेत बीड, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 289 अन्वये अंबादास दानवे यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला. या हत्येमधील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, तसंच या घटनेमध्ये दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी केली. या हत्येमध्ये राज्य मंत्रिमंडळातील एका मत्र्यांच्या जवळचे असलेले वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याची शंका गावकऱ्यांना असल्याची माहिती सुद्धा दानवे यांनी सभागृहात दिली.

संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या दोन्ही घटना या गंभीर असल्याचं सांगितलं आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. "परभणी येथे संविधानाचा अपमान करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण होती, तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळं विरोधी पक्षानं याबाबत राजकारण न करता अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी चांगल्या सूचना मांडाव्यात," अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केली. अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "सभागृहात एखाद्या मंत्र्याकडे अशा पद्धतीचे निर्देश करणं हे योग्य नाही. गुन्हेगाराला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार. यासोबतच आरोपींना वाचवण्यासाठी आमच्यावर कुठलाही दबाव नसून सरकारला कुणाचा फोनही आला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

  1. यूपीए-२ च्या पराभवावरून मणिशंकर यांचा गांधी परिवारावर निशाणा, राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय वाटते?
  2. मी मुख्यमंत्री असतो तर मंत्रिपदासाठी नांदेडचा विचार केला असता, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
  3. छगन भुजबळ यांना मंत्रिपद का नाकारलं? संजय राऊतांनी 'हे' सांगितलं कारण

Last Updated : Dec 16, 2024, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.