ETV Bharat / politics

असली - नकलीचा 'फैसला' निकालानंतरच; राज्यात तब्बल 83 जागांवर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीत थेट लढत - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यातील 288 विधानसभा मतदार संघांपैकी 47 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना (उबाठा) तर 36 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) अशी थेट लढत होणार आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 5:32 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली असताना खरी लढत ही भाजपा प्रणित महायुती आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी यांच्यातच आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात फूट पाडल्यानंतर शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष तयार झाले. यानंतर खरी शिवसेना तसंच खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? ही लढाई लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. तर आता विधानसभेची निवडणूक असल्यानं फुटीर आमदारांची खरी कसोटी लागणार आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदार संघांपैकी 47 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर 36 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अशी थेट लढत होत आहे. या जागांवरच राज्यातील सत्तेचं समीकरण बऱ्यापैकी अवलंबून असून यामध्ये जो बाजी मारेल तो सत्तेच्या जवळ जाण्याची चिन्हं आहेत.

कोकणात 18 जागांवर भिडणार शिवसैनिक : 20 नोव्हेंबरला 15व्या विधानसभेसाठी निवडणूक होत असून त्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. राज्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेसाठी पहिल्यांदाच आपापसात भिडत आहेत. लोकसभा निवडणुकीतही हे चित्र पाहायला मिळालं. परंतु तेव्हाची राजकीय समीकरणं वेगळी होती. आता एकीकडे पक्षावर निष्ठा ठेवणारे तर दुसरीकडे पक्षातून बंडखोरी करत बाहेर पडलेले आमदार एकमेकांच्या विरोधात ठाकल्यानं निवडणुकीतील रंगत वाढली आहे. राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना (उबाठा) तर 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) अशी लढत होणार आहे. या जागांवर दोन्ही पक्षांकडून पूर्ण ताकद लावली गेली असून असली, नकलीचा फैसलासुद्धा या निकालातून स्पष्ट होणार आहे. दोन शिवसेनेमध्येच लढत होणाऱ्या एकूण 47 जागांपैकी मुंबई विभागातील 16, कोकण विभागातील 18, मराठवाडा विभागातील 7 तर उर्वरित जागा या पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसंच विदर्भातील आहेत.

शरद पवारांचे 15 शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात : दोन्ही शिवसेनेप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा 36 जागांवर थेट लढत होणार आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांना भिडणार आहेत. अजित पवारांनी त्यांच्या 35 विद्यमान आमदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर शरद पवारांनी सुद्धा अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या राहिलेल्या 15 आमदारांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात काका अजित पवार यांची लढाई पुतणे युगेंद्र पवार यांच्यासोबत होत आहे. लोकसभा निवडणुकीत हीच लढाई भावजय सुनेत्रा पवार विरुद्ध नणंद सुप्रिया सुळे यांच्यात झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षानं 7 तर अजित पवार यांच्या पक्षाला फक्त एकच जागा जिंकता आली होती. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर निवडणुकीच्या या रणधुमाळीत अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवारांना शरद पवार पक्षाच्या उमेदवारांशी दोन हात करावे लागणार आहेत.

दोघांसाठी अस्तित्वाची आणि निर्णायक लढाई : माहीम, भायखळा, मागाठणे, कुर्ला, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विक्रोळी, चेंबूर, दिंडोशी, भांडुप, शिवडी, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, ओवळा माजिवडा या विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेमध्ये थेट लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पराभवानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यातून बोध घेत विधानसभेसाठी स्वतंत्र रणनीती आखली आहे. अशामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये होत असलेली ही लढाई त्यांच्यासाठी अतिशय निर्णायक आणि अस्तित्वाची ठरणारी आहे. याकरता या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या लढतींबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते, वकील वैजनाथ वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, "खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही थोडे मागे राहिलो असलो तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीत आमचा दमदार विजय होणार आहे, यात शंका नाही. अजित पवार सत्तेत आल्यानं जागा वाटपाची सूत्रं बदलली एवढंच."

हेही वाचा

  1. बारामतीत पवारांचे 2 पाडवा मेळावे; शरद पवार म्हणाले, "जुनी पद्धत कायम राहिली असती, तर आनंद झाला असता"
  2. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काँग्रेसच्या चेन्नीथला यांचा गंभीर आरोप
  3. महिलांसंदर्भातील 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर अरविंद सावंतांकडून फक्त दिलगिरी व्यक्त, पण माफीनामा नाहीच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.