पुणे : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये पुण्यातील कोथरूड पर्वती तसंच शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर कसबा, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पेच अजूनही कायम असल्यानं पहिल्या यादीत येथील उमेदवारांची नाव घोषित करण्यात आलेली नाही.
माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा संधी : भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील कोथरूड मतदार संघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर पर्वती मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा संधी देण्यात आलीय. शिवाजीनगर मतदार संघातून देखील सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या मतदारसंघात अजूनही पेच कायम : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ तसंच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आणि खडकवासला मतदारसंघातील उमेदवारांची पहिल्या यादीत नाव जाहीर न करण्यात आल्यानं या मतदारसंघातील आमदार तसंच इच्छुकांमधील दागदी वाढली असून मतदारसंघातील पेज अजूनही कायम आहे.
इच्छुक काय करणार? : पुण्यातील पर्वती मतदारसंघातून भाजपाकडून माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे इच्छुक होते. त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून जोरदार तयारी देखील केली होती. मात्र त्यांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं आता भिमाले काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. तसंच कोथरूड मतदारसंघात देखील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात अमोल बालवडकर यांनी बंड पुकारला असून ते देखील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तसंच पक्षातील अनेकांचा विरोध असतानाही शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं तिथं देखील पक्षातील पदाधिकारी काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
हेही वाचा