ETV Bharat / politics

झुकेगा नही..., अमरावतीत सहापैकी चार बंडखोर उमेदवार आपल्या भूमिकेवर ठाम

अमरावती जिल्ह्यातील सहापैकी चार बंडखोर उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. तिवसा आणि मेळघाट मतदारसंघातील भाजपाच्या बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतलीय.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
बंडखोर उमेदवार (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 7:44 PM IST

अमरावती : अमरावती जिल्ह्यात बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेना असे दोन उमेदवार, अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपाचा एक उमेदवार आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एक उमेदवार असे चार बंडखोर उमेदवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तिवसा आणि मेळघाट मतदारसंघातील भाजपाच्या बंडखोरांनी मात्र अखेरच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतलीय. यामुळं आता बडनेरा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोर प्रीती बंड आणि भाजपाचे बंडखोर तुषार भारतीय यासह अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपातील बंडखोर जगदीश गुप्ता आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पदाधिकारी विक्रम ठाकरे हे चार बंडखोर उमेदवार निवडणूक काळात चर्चेत राहतील. विशेष म्हणजे यांची भूमिका मतदारसंघात मोठी उलटफेर निर्माण करणारी ठरू शकते.

माझी भूमिका पक्षासाठी पोषक : "लोकसभा निवडणुकीपासूनच मी माझी दिशा ठरवली. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचं चिन्ह घेतलं, त्यांनी विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाचं चिन्ह नाकारलं. हे संधीसाधू लोक आहेत. यामुळेच माझ्या पक्षासाठी माझी भूमिका ही पोषक ठरणारी आहे. गेल्या 40 वर्षांपासून भाजपा बळकट व्हावी, हाच प्रयत्न माझा राहिला आणि आता देखील बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपा मजबूत ठेवण्याचाच माझा प्रयत्न आहे," असं भाजपाशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढणारे तुषार भारतीय यांचं म्हणणं आहे.

तुषार भारतीय यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

मातोश्रीच्या स्वाभिमानासाठी माझा लढा : "मातोश्रीविरुद्ध बडनेरा विधानसभा मतदारसंघातून कट कारस्थान रचण्यात आली. मातोश्रीविरुद्ध इथल्या मंडळींनी पुकारलेलं बंड हे खरंतर वेदनादायी होतं. यामुळंच माझा लढा हा मातोश्रीच्या स्वाभिमानाचा लढा आहे. मला शिवसेनेची उमेदवारी मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र ऐनवेळी काय गडबड झाली माहिती नाही. माझे सर्व शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. आम्ही सर्व मिळून मातोश्रीच्या स्वाभिमानाचा लढा जिंकणार," अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांनी स्पष्ट केली.

निवडून आलो तर भाजपाचाच : "भाजपा पक्षानं मला समाजसेवेची संधी दिली. यामुळंच मी आमदार आणि राज्यमंत्री झालो. विधान परिषदेवरही मला माझ्या पक्षानं संधी दिली. आता काही काळ मी सक्रिय वाटत नसलो, तरी भाजपासोबत बांधिलंच होतो. यावर्षी आता मी भाजपाचं रितसर सदस्यत्व घेतलं नाही. यामुळं माझ्यावर कुठलाही नेत्यांचा दबाव वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक मी लढत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघाची झालेली दुर्दैवी परिस्थिती लक्षात घेत मी माझी उमेदवारी जाहीर केली असून मला विजयाची खात्री आहे. मी निवडून आलो तर नक्कीच भाजपाचा आमदार असेल," असं भाजपाचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता म्हणालेत.

मोर्शीमध्ये विक्रम ठाकरे भूमिकेवर ठाम : मोर्शी विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अमरावती जिल्ह्यात हा एकमेव मतदार संघ सुटला असून या ठिकाणी गिरीश कराळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी पक्षाशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

दोघांनी घेतली माघार : पक्षानं उमेदवारी दिली नसल्यामुळं तिवसा मतदार संघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी करणारे रविराज देशमुख यांनी बंडाचा झेंडा हाती घेत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी घुमजाव करत उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे रविराज देशमुख यांना भाजपानं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून घोषित केलं. मेळघाट विधानसभा मतदारसंघात देखील भाजपाचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज अखेरच्या दिवशी भिलावेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत मेळघाट मतदार संघात भाजपाचे अधिकृत उमेदवार केवलराम काळे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा

  1. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली; बीड विधानसभा मतदारसंघातून कोणी घेतली माघार? पाहा लिस्ट
  2. कोल्हापुरात महाविकास आघाडीला धक्का; अखेरच्या क्षणी मधुरिमा राजे यांचा उमेदवारी अर्ज मागे, सतेज पाटील भडकले
  3. राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.