ETV Bharat / politics

नाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी 196 उमेदवार रिंगणात, 141 उमेदवारांची माघार

नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 337 उमेदवारांचे अर्ज दाखल होते. आज अखेरच्या दिवशी 141 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 15 जागांसाठी आता 196 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
विधानसभा निवडणुक 2024 (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 8:17 PM IST

Updated : Nov 4, 2024, 10:50 PM IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील तब्बल 141 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यात मालेगाव बाह्य मतदारसंघात सर्वाधिक 21 उमेदवार तर त्या पाठोपाठ नांदगाव मतदारसंघात 18 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. कळवण मतदारसंघात सर्वात कमी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत : नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे दिलीप कुमार भामरे, शशिकांत जाधव, छावा क्रांतीवर संघटनेचे करण गायकर, महेश हिरे, डॉ.डी.एल.कराड यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांच्यात लढत होणार आहे.

हेमलता पाटील यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

नाशिक मध्यमध्ये दुरंगी लढत : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ही जागा काँग्रेसची असल्याचं म्हणतं काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. त्यामुळं वसंत गिते यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हेमलता पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळं वसंत गिते यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. तसंच याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह गुलजार कोकणी, हनिफ बशीर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसंच मनसेचे उमेदवार अंकुश पवार यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळं नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते अशी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

दिंडोरीत माघार तर देवळलीत बंडखोरी : दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली होती. दिंडोरीतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळं या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अर्ज माघार घेण्यासाठी अगदी शेवटची काही मिनिटं शिल्लक असतानाच धनराज महाले यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळं झिरवळ यांना काहीसा दिलासा मिळाला. देवळाली मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्यानं त्यांनी उमेदवारी कायम ठेवली असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा

  1. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट; महायुती महाविकास आघाडीत होणार समोरासमोर लढत
  2. झुकेगा नही..., अमरावतीत सहापैकी चार बंडखोर उमेदवार आपल्या भूमिकेवर ठाम
  3. राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर

Last Updated : Nov 4, 2024, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.