ETV Bharat / politics

महाविकास आघाडी 180 जागा जिंकून सत्ता स्थापन करेल; 'या' काँग्रेस नेत्यानं व्यक्त केला विश्वास

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 180 जागा जिंकून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

अहिल्यानगर : "विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी राज्यभर प्रचार दौरा केला. राज्यात सर्वत्र महायुती सरकारबद्दल प्रचंड राग असून निवडणुकीत महाराष्ट्रात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल," असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. असंवैधानिक आणि भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी 180 जागांसह विजयी होईल : "राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास, यामुळं जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 जागांसह विजयी होईल. मी राज्यभर प्रचार करत असताना संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे."

प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात (ETV Bharat)

राहाता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत : "संगमनेरमधून नक्कीच मोठा विजय होणार असून जिल्ह्यात सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. याचबरोबर शेजारी राहाता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत आणि दडपशाही आहे. 35 वर्ष एका घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे असताना सुद्धा त्यांना तालुक्याचा विकास करता आला नाही. नगर-मनमाड रस्त्याची मोठी दुरावस्था असून यामुळं हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत."

साई संस्थानमधील 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित : साई संस्थानमधील 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थानचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खासगी 200 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय? असे विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते मात्र तेथे ते होऊ दिले जात नाही. संस्थानच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जात आहे.

शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढली : मूळचे भाजपाचे कार्यकर्ते यांची दुरावस्था करून टाकली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवर आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरलं आहे. शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. हे सर्व थांबवायचं असेल तर सर्वांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजं. संगमनेरमध्ये ज्याप्रमाणे शांतता-सुव्यवस्था आणि विकास आहे. तसं काम राहाता तालुक्यात करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहाता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी मी तयार आहे. ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई असून सर्वांनी सहभागी होऊन घोगरे यांना विजयी करावे असं आवाहन त्यांनी केलं.

राजकारणासाठी जनतेशी खेळू नये : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. असं असताना सुद्धा तळेगावाला पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिलं जात नाही. लोकप्रतिनिधी या नात्यानं वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन ही मागणी टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे हे कळालं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनाने असे एकतर्फी वागणं अत्यंत चुकीचं आहे. प्रशासनानं नेहमी जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा -

  1. नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, विनोद तावडेंना घेरलं
  2. अजित पवारांचे बंधू श्रीनिवासांच्या कंपनीत पोलिसांचे सर्च ऑपरेशन, नेमकं कारण काय?
  3. सात माजी नगरसेवकांची भाजपामधून हकालपट्टी; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.