ETV Bharat / politics

“माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचे असेल तर…”; राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा - lok sabha elections

Lok Sabha Elections : राज्यातील महत्वाच्या जागेपैकी एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok Sabha Constituency) आहे. काँग्रेसनं आमदार प्रणिती शिंदे यांना (Praniti Shinde)उमेदवारी घोषित केलीय. तर दुसरीकडं भाजपानं देखील माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं आमदार विरुद्ध आमदार अशी ही निवडणूक होणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष सोलापूरकडं लागलं आहे.

Praniti Shinde Vs Ram Satpute
प्रणिती शिंदे आणि राम सातपुते
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 10:14 PM IST

प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे आणि राम सातपुते

सोलापूर Lok Sabha Elections : सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते (Ram Satpute) आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यात प्रचारातुन आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांना भिडले आहेत .भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी थेट सुशीलकुमार शिंदेना टार्गेट केले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी राम सातपुते यांनी केलीय. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी कडक शब्दांत उत्तर देत, मी उमेदवार आहे, माझ्याशी भिडना अशा भाषेत राम सातपुते यांना उत्तर दिलं आहे. भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी मी बोलणारच कारण, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, सोलापूरच्या विकासासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित केलाय. काँग्रेसने घराणेशाही केली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन बालपण गेलेल्या उमेदवाराला काँग्रेसनं उमेदवारी दिलीय. गरीब घरातील उमेदवार काँग्रेसकडं नव्हता का? असा प्रश्न राम सातपुते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

विजय शिवतारेचं मिटलं आता अमरावतीचं देखील मिटेलं : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार राम सातपुते हे गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कार्यालयात जाऊन महायुतीची बैठक घेतली. माध्यमांना माहिती देताना राम सातपुते यांनी माहिती दिली. विजय शिवतारे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ याबाबत वाद टोकापर्यंत गेला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे याना भेटून हा वाद संपुष्टात आणला. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानं घटक पक्ष बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद लवकरच संपुष्टात येईल आणि माढ्याचा तिढा देखील सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

प्रणिती शिंदेंवर सडकून टीका : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांवर सडकून टीका केलीय. राम सातपुते यांच्या टिकेनं काँग्रेसच्या गोटात संतापाचं वातावरण पसरलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करा, सोन्याचा चमचा, घराणेशाही, उपरे अशा शब्दांत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांवर टिका केली. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर देत, मी उमेदवार आहे. माझ्याशी भीडा, माझ्या वडिलांना का बोलताय अशा शब्दांत पलटवार केलाय.

हेही वाचा -

  1. कॉंग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या चारचाकीवर कुणी केला हल्ला? थेट पक्षाचं नाव सांगितलं! - Praniti Shinde attacked
  2. महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात - Congress Candidate List
  3. Praniti Shinde : कोविड लसीबाबत आमदार प्रणिती शिंदेंचा अजब दावा; म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.