ETV Bharat / politics

विधानसभा प्रचाराच्या आखाड्यात आठ आजी-माजी मुख्यमंत्र्यांची उडी; जाणून घ्या कोण आहेत ते दिग्गज? - Lok Sabha Elections 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 4:09 PM IST

Updated : Aug 30, 2024, 10:32 PM IST

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्व पक्षांनी तयारी केली असली तरी या निवडणुकीच्या प्रचारात आठ आजी-माजी मुख्यमंत्री उतरणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचाराची ही रंगत चुरशीची होणार आहे.

Lok Sabha Elections 2024
लोकसभा निवडणुक 2024 (Source - ETV Bharat)

मुंबई Lok Sabha Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जागावाटपाबरोबरच प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. या प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये दिग्गज नेते रणांगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आठ आजी-माजी मुख्यमंत्री प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील. एखाद्या राज्यात एवढ्या मोठ्या संख्येनं आजी-माजी मुख्यमंत्री प्रचारात उतरण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार वयाच्या 85व्या वर्षीही प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. शरद पवार 50 वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणात आहेत. 1978 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी उर्वरित आमदारांसह लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि दहापैकी आठ उमेदवार जिंकून आपली ताकद सिद्ध केली. ते आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य भूमिकेत दिसतील.

एकनाथ शिंदे : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजना' राबवून प्रचाराची सूत्रं आपल्या हातात घेतली. या योजनेचा आणि गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकास कामांचा प्रचार मुख्यमंत्री जोरदारपणे करत आहेत. महायुतीतल्या अंतर्गत वादांचा सामना करत मुख्यमंत्र्यांना प्रचारात बाजी मारावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 2019 ते 2022 या काळात अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच पक्षातील अंतिम मंत्रिमंडळातील सदस्य एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. हा घाव जिव्हारी लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलीच टक्कर दिली. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली असून या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर ते सत्ताधाऱ्यांना अडचणी आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू नेते तसेच भारतीय जनता पार्टीचे 'चाणक्य' म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र, ते सरकार टिकलं नाही. आता पुन्हा एकदा राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रिंगणात काय करिष्मा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अशोक चव्हाण : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनीही राज्याच्या राजकारणात आपलं वजन निर्माण केलं होतं. अशोक चव्हाण यांनी दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलंय. मात्र, आदर्श घोटाळ्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षात अतिशय निष्ठावान म्हणून असलेले अशोक चव्हाण हे लोकसभेत खासदारही राहिले मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार आहेत. आता ते भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरणार आहेत.

पृथ्वीराज चव्हाण : राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांना पदावरून दूर केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. काँग्रेस पक्षाशी अतिशय निष्ठावान घराणं म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिले जातं. आता ते या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख म्हणून भूमिका बजावणार आहेत.

नारायण राणे : राज्यात प्रथमच महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 1999मध्ये नारायण राणे यांना केवळ सहा महिने मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. कोकणातील दिग्गज नेते आणि कोकणावर वर्चस्व असलेलं घराणं म्हणून राणे कुटुंबाकडे पाहिलं जातं. अत्यंत आक्रमक शैलीचे नेतृत्व म्हणून राणे यांची ओळख आहे. ते सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार असून आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची धुरा असणार आहे.

सुशीलकुमार शिंदे : अतिशय अभ्यासू आणि शांत व्यक्तिमत्व म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. 2003 ते 2004 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी आंध्रप्रदेशचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केलं. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सध्या खासदार आहेत. राज्याच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांचा दबदबा आजही कायम असून आता ते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहेत.

सर्वच नेत्यांचा कस लागणार : या निवडणुकीमध्ये राज्यातील परिस्थिती ही कुणा एका पक्षासाठी किंवा एका आघाडीसाठी पोषक आहे, असं म्हणता येणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही तुल्यबळ आघाड्यांना परस्परांविरोधात आक्रमकरीत्या प्रचार करावा लागणार. सध्या तरी कुणा एकाचं पारडं जड आहे, असं म्हणता येत नसल्यानं राज्याच्या या आठही आजी-माजी मुख्यमंत्र्यांना प्रचारात कडवी झुंज द्यावी लागणार.

हेही वाचा

  1. वाढवण बंदरामुळं दोन लाख तरुणांना रोजगाराची संधी; देशातील एकमेव नैसर्गिक बंदर, वाचा सर्वकाही फक्त एका क्लिकवर - PM Modi Vadhavan Port Bhoomi Pujan
  2. स्वत:चं पाप नेव्हीवर कशाला ढकलताय, सरकार जोडे मारण्याच्याच लायकीचं - संजय राऊत यांचा संताप - Sanjay Raut
  3. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का - Jitesh Antapurkar resignation

Last Updated : Aug 30, 2024, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.