मुंबई : नवीन वर्ष 2025ची प्रत्येकजण प्रतिक्षा करत आहेत. कुणी प्रवासाचा बेत आखत आहेत, तर कुणी कुटुंबाबरोबर सिनेमा पाहण्याचा प्लॉनिंग करत आहेत. तुम्हीही तुमच्या कुटुंबाबरोबर काही फॅमिली शो पाहण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी टॉप 5 सर्वोत्कृष्ट कौटुंबिक ड्रामा घेऊन आलो आहोत, हे शो तुम्ही घरी बसून देखील पाहू शकता.
'गुल्लक' : 'गुल्लक' हा एक उत्तम फॅमिली ड्रामा आहे. कॉमेडी, इमोशन आणि कौटुंबिक ही वेब सीरीज खूप चर्चेत आहे. जमील खान आणि गीतांजली कुलकर्णी संतोष आणि शांती मिश्रा यांनी या वेब सीरीजमध्ये सुंदर अभिनय केला आहे. तुम्ही ही सीरीज सोनी लिव्हवर पाहू शकता.
'पंचायत 3' : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर लोकप्रिय शो 'पंचायत' यावर्षी मे महिन्यात तिसरा सीझन घेऊन परतला आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित या शोमध्ये रघुबीर यादव, चंदन रॉय आणि फैसल मलिक यांच्याही विशेष भूमिका आहेत. आयएमबीडीवर या सीरीजचे रेटिंग 9/10 आहे. ही सीरीज प्रेक्षक प्राइम व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता.
'गुलमोहर' : 'गुलमोहर' ही गोष्ट बत्रा कुटुंबाची कहाणी आहे. या घरातील सदस्य 31 वर्षांपासून एका घरात राहत असतात, यानंतर ते नवीन शहरात जाणार असतात. 'गुलमोहर'ची कहाणी कुटुंबावर आधारित आहे. मनोज बाजपेयी, शर्मिला टागोर, सिमरन, सूरज शर्मा, अमोल पालेकर आणि कावेरी सेठ यांच्या विशेष भूमिका यात आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा कौटुंबिक ड्रामा पाहू शकतात. या सीरीजला 7.6/10 रेटिंग मिळाली आहे.
'द फैमिली मैन' : 'द फॅमिली मॅन' ही एक ॲक्शन-ड्रामा सीरीज आहे. यामध्ये एका मध्यमवर्गीय माणसाची कहाणी दाखविण्यात आली आहे, जो राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष सेलसाठी काम करतो. जिथे तो देशाला दहशतवाद्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा ड्रामा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. आयएमबीडीवर याला 8.7/10 रेटिंग मिळाली आहे.
'महाराजा' : 'महाराजा'ची कहाणी खूप वेगळी आहे. या चित्रपटामध्ये महाराजा मुलगी लक्ष्मीचा डस्टबीनमुळे जीव वाचतो, त्यामुळे महाराजा हा त्या डस्टबीनला खूप सांभाळून ठेवतो. मात्र एक दिवस हा डस्टबीन चोरीला जातो यानंतर महाराजा पोलीस ठाण्यात तक्रार करतो. यानंतर चित्रपटामध्ये काय घडते हे तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटाला 8.5/10 रेटिंग मिळाली आहे.