ETV Bharat / politics

कोकणात नारायण राणेंचा डंका; विनायक राऊतांचा पराभव, नितेश राणेंकडून जल्लोष - Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024 - RATNAGIRI SINDHUDURG LOK SABHA RESULTS 2024

Lok Sabha Election Results 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024) महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane Win) यांचा विजय झाला आहे. राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केलाय.

Lok Sabha Election Results 2024
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 3:44 PM IST

Updated : Jun 4, 2024, 6:30 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात मतमोजणी झाली. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाकडं (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024) अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane Win) यांचा विजय झालाय. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा पराभव केला आहे. विजयानंतर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जल्लोष साजरा केला.

शिवसेनेचा बालेकिल्ला : रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवलेले नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा १.७८ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत निलेश राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवून जिंकवून दाखवली आहे.

नितेश राणे यांनी केला जल्लोष : चौदाव्या फेरी अखेर नारायण राणे यांना 2 लाख 67 हजार 690 इतकी मतं मिळाली. तर विनायक राऊत यांना 2 लाख 40 हजार 431 इतकी मतं पडली होती. त्यामुळं नारायण राणे यांनी तब्बल 27 हजार 259 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळं त्याचवेळी वडिलांनी आघाडी घेताच आमदार नितेश राणे यांनी जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेरच आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय. यावेळी त्यांच्या आई देखील सोबत होत्या. नारायण राणे यांच्या विजयानंतर नितेश राणे यांनी आईला मिठी मारली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

वर्ष - 2019 : विनायक राऊत (विजयी उमेदवार- शिवसेना) 50.83% मतं

वर्ष - 2014 : विनायक राऊत (विजयी उमेदवार- शिवसेना) 55.02% मतं

वर्ष - 2009 : निलेश राणे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 49.24% मतं

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा इतिहास : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा एकत्र करुन या मतदार संघाची निर्मिती करण्यात आलीय. ही जागा 2008 साली अस्तित्वात आलीय. त्यानंतर 2009 मध्ये इथं पहिली लोकसभा निवडणूक झाली. या प्रदेशावर बौद्ध, हिंदू, पोर्तुगीज, मुस्लिम, ब्रिटीश शासकांनी राज्य केलंय. हा मतदारसंघ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. या भागातील रत्नागिरी जिल्ह्यात प्राचीन गणपतीपुळे मंदिर आहे. हे मंदिर 400 वर्षांहून अधिक जुनं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी इथं झाला होता. रत्नागिरीच्या देवगडचा हापूस आंबा अल्फोन्सो जगप्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू, फणसासाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर लांब आणि सुंदर समुद्रकिनारे, हिरवीगार जंगले, पर्वतांनी वेढलेला आहे. येथील समुद्रात 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता.

हेही वाचा -

  1. ठाकरे गटाचा पहिला उमेदवार विजयी; शिर्डीत शिवसेनेकडून शिवसेनेचा पराभव - Maharashtra lok Sabha election
  2. भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव - Shirdi Lok Sabha Results 2024

Last Updated : Jun 4, 2024, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.