ETV Bharat / politics

पाहिजे असलेले मतदारसंघ न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज होणारच, पक्षश्रेष्ठींकडं भावना कळवल्या - वर्षा गायकवाड - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप झाल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत असले तरी काही जागांवर अद्यापही कुरबूर सुरु असल्याचं दिसतंय. मुंबईतील जागावाटपावरून आपण नाराज नसल्याचं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Lok Sabha Election 2024
मुंबईतील 'या' जागांची आदलाबदल महाविकास आघाडीच्या पथ्यावर? कोणत्या आहेत जागा, काय आहे समीकरण?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 1:49 PM IST

Updated : Apr 12, 2024, 3:33 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील मुंबईतील काही जागांवरुन ठाकरे गटाविरोधात काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळतंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विरुद्ध मुंबई काँग्रेस अशा प्रकारचा नवा वाद उफाळून आलाय. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्यानं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी व्यक्त केलीय.

मुंबईतील जागा वाटपावेळी काँग्रेसला विचारात घेतलं नसल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केल्यामुळे ठाकरे गट आणि मुंबई काँग्रेस यांच्यातील नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वर्षा गायकवाड आपलं म्हणणं मांडण्यासाठी आज दिल्लीला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते यांनी दिली.

जागा आदलबदल केल्यास आनंद - वर्षा गायकवाड : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, "यापूर्वी मुंबईत काँग्रेस पक्ष पाच जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर निवडणूक लढवायचा. महाविकास आघाडीत आम्हीदेखील समान आहोत. कमीत कमी दोन ते तीन जागा मिळाव्या यासाठी पक्षश्रेष्ठींना कळवलंय. मात्र, पक्षानं काही निर्णय घेतल्यानंतर तो स्वीकारावा लागतो." तसंच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी यासाठी, ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेतल्याचं वर्षा गायकवाड यांनी मान्य केलंय. "घोसाळकर यांची काही लोक मला भेटून गेले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आमची ताकद मोठी असून जागा आदलाबदल करायचं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू", असंही वर्षा गायकवाड म्हणल्या. "पक्ष जो निर्णय घेतो आम्हाला मान्य असेल. मात्र जागावाटपासंदर्भात वस्तुस्थिती आम्ही पक्षश्रेष्ठींकडे म्हणणं मांडलं आहे," असं गायकवाड यांनी सांगितलंय.

नाराजीच्या बातम्या चुकीच्या : "महाविकास आघाडी म्हणून जागा वाटपात मुंबई काँग्रेसनं तीन मतदारसंघाची मागणी केली होती. पण दोनच मतदारसंघ मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे. विषेशतः मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. आपल्यला हवे ते मतदार संघ मिळाले नसल्यानं कार्यकर्ते नाराज होणारच त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवणं, हे आपलं कर्तव्य आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. त्यानुसार आपलं मत व्यक्त करता येतं. तसंच आपण नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून सुरू आहेत," त्यात काहीही तथ्य नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

तेजस्वी घोसाळकरांनी घेतली वर्षा गायकवाड यांची भेट : काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचं नाव चर्चेत आलंय. त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसापूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशा प्रकारचा आग्रह वर्षा गायकवाड यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच यासंदर्भात तेजस्वी घोसाळकर लवकरच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

ठाकरे गटाकडून लढणार - विनोद घोसाळकर : काँग्रेस पक्षाकडून आपल्यला लढण्याची ऑफर दिली होती, असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं. आपण सदर जागेवरुन काँग्रेस चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला असून लढणार तर ठाकरे गटाकडूनच असं स्पस्ट केलं होतं. तसंच काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नसेल तर त्यांनी जागा आम्हला सोडून द्यावी असा सल्ला विनोद घोसाळकर यांनी काँग्रेस पक्षला दिला. भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांना विनोद घोसाळकर चांगली टक्कर देऊ शकतात असं स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शेवटी निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आजपासून सुरू, देशातील ९४ मतदारसंघांसह राज्यातील ११ मतदारसंघांकरिता भरता येणार नामांकन - lok Sabha election 2024
  2. मनसेच्या एन्ट्रीमुळं नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार? काय म्हणाले राजकीय तज्ज्ञ? - lok sabha election 2024

Last Updated : Apr 12, 2024, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.