ETV Bharat / politics

नागपुरात ४७.९१ टक्के, तर रामटेकमध्ये ५२.३८ टक्के मतदान; प्रतिक्षा निकालाची - Nagpur Lok Sabha Constituency

Nagpur Lok Sabha Election 2024 : नागपूर आणि रामटेक या दोन मतदारसंघासाठी शांततेत मतदान पार पडलं. नागपुरात ४७.९१ टक्के, तर रामटेकमध्ये ५२.३८ टक्के सरासरी मतदान झालं. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे अशी थेट लढत होत आहे.

Nagpur Lok Sabha Constituency
नागपूर आणि रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात; 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 8:09 AM IST

Updated : Apr 19, 2024, 7:37 PM IST

नागपूर आणि रामटेकमध्ये मतदानाला सुरुवात

नागपूर Nagpur Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे अशी थेट लढत होत आहे. तर जिल्ह्यातील दुसऱ्या म्हणजेच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे असा सामना होत आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडलं.

दिग्ग्जांनी केलं मतदान : नागपूर मतदारसंघासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह मतदान केलं. 101 टक्के जिंकून येण्याचा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मतदान शांततेत पडलं पार : पहिल्या टप्प्यात विदर्भातील एकूण पाच मतदारसंघाचा समावेश आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार असून त्याकरिता रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून पोलिंग पार्टीला मतदानाचं साहित्य वाटप केलं होतं. मतदान केंद्रांवर पोलिंग पार्टी रात्रीच दाखल झाल्या होत्या. नागपूर आणि रामटेक मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

124 संवेदनशील मतदान केंद्रे : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान झालं. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झालं होतं. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्र होतं. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे होते. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदशील मतदान केंद्रे होते. तर नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश होता.

गडकरींच्या विकासावर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह : लोकसभेची ही निवडणूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली विकास कामं, त्या भरवश्यावर नितीन गडकरी ही निवडणूक लढवत आहेत. तर विकास ठाकरे गडकरींच्या विकास कामांवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तिकडं रामटेक मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिवसेनेचे राजु पारवे अशी लढत आहे. सलग 17 दिवस दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी प्रचंड घाम गाळलाय. त्यामुळं 'रामटेकचा राम कुणाचे करेल काम' हे तर 04 जून रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

  1. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना, प्रशासनाची तयारी पूर्ण; नागपूर, रामटेकमध्ये 124 संवेदनशील मतदान केंद्रे - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 19, 2024, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.