ETV Bharat / politics

लातूर शहर महापालिकेच्या वेबसाईटवर इचलकरंजीच्या मतदारांची यादी, अधिकाऱ्यांवर कारवाईची भाजपाची मागणी - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 10:52 PM IST

Lok Sabha Election 2024 : सध्या राज्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. लातूर शहर महानगरपालिकेच्या (Latur City Municipal Corporation) संकेतस्थळावर लातूर शहराच्या मतदारांची यादी ऐवजी कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या मतदारांची यादी (Voters List) प्रकाशित झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. ही चूक करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लातूर भाजपानं केलीय.

Latur Mahapalika
लातूर शहर महापालिका

प्रतिक्रिया देताना ॲड. प्रदीप मोरे

लातूर Lok Sabha Election 2024 : शहर महानगरपालिकेच्या (Latur City Municipal Corporation) संकेतस्थळावर लातूर शहराच्या मतदारांची यादी (Voters List) ऐवजी कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या मतदारांची यादी प्रकाशित झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. लातूर शहर महानगरपालिकेच्या mclatur.org या संकेतस्थळावर लातूर शहरातील मतदारांची अंतिम यादी शोधली असता, तेथे इचलकरंजी महानगरपालिकेच्या तोरणा नगर, आर.के नगर भागातील मतदारांची यादी दिसत आहे. ही यादी दिनांक 5 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्याचा उल्लेख या संकेतस्थळावर आहे.

आता आपल्याकडं कुठलीही मतदार यादी नसते. जेव्हा महापालिकेची निवडणूक असते तेव्हा मतदार यादी जाहीर होत असते. ती यादी अद्याप अपडेट झालेली नसेल. मी अधिकाऱ्यांना तपासण्यासाठी सूचना दिल्या आहेत. मतदार यादी ही भारतीय निवडणूक आयोगाकडं असते. जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगातून जाहीर होतो. तेव्हा राज्य निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोगानं जी मतदार यादी तयार केलेली आहे. त्याची कट ऑफ डेट ठरवून ती यादी महापालिका प्रशासनाकडं पाठवत असते. निवडणूक काळात लातूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर कुठलीच मतदार यादी असणं अपेक्षित नाही. जी मतदार यादी लातूर महापालिकेच्या संकेतस्थळावर आहे ती तात्काळ काढली जाईल. - बाबासाहेब मनोहरे, आयुक्त, लातूर शहर महानगरपालिका

अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी : सध्या जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रशासनाकडून मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं जातय. निवडणूक आयोगानं नव्या मतदारांसह जाहीर केलेल्या अंतिम यादीत लातूर शहरातील मतदार आपलं नाव शोधत आहेत. परंतु, लातूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर 2024 च्या मतदारांची अंतिम यादी शोधली असता, त्या ठिकाणी कोल्हापूरच्या इचलकरंजी महानगरपालिकेची मतदारांची यादी दिसत आहे. यामुळं लातूरकरांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळं ही चूक तात्काळ दुरुस्त करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी लातूर भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रदीप मोरे यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच, कधी होणार मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश, खुद्द शरद पवारांनीच सांगितलं - Madha Lok Sabha Constituency
  2. "भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधान मोदींनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं," माजी केंद्रीय संरक्षणमंत्री पवार काय म्हणाले? - Sharad Pawar
  3. काँग्रेसला दिली कारल्याची उपमा, तर नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; चंद्रपूरच्या सभेत मोदींची चौफेर फटकेबाजी - PM Narendra Modi Chandrapur Sabha

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.