ETV Bharat / politics

"बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेता अन् त्यांच्याच...", प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल - PRIYANKA GANDHI IN KOHAPUR

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन दाखवा असे आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी कडाडून टीका केली. त्या कोल्हापुरीतल सभेत शनिवारी बोलत होत्या.

Kolhapur Assembly Election 2024 Priyanka Gandhi says PM Modi takes Balasaheb Thackeray name and stabs his son in the back
प्रियंका गांधी, नरेंद्र मोदी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2024, 10:19 AM IST

कोल्हापूर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोल्हापुरात केली. कोल्हापुरातील गांधी मैदानात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत त्या शनिवारी बोलत होत्या.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी? : प्रियंका गांधी म्हणाल्या, " कोल्हापूर ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या वीरांची भूमी आहे. या भूमीतील संतांनी समाजाला मानवतेचा आणि समानतेचा संदेश दिलाय. देशातील काही मोठे नेते भाषण करताना ऐकलं. हे नेते भाषणात सकारात्मक आणि खरं बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे निराश करणारी आहेत. महाराष्ट्रात नेत्यांकडून या भूमीचा अपमान होतोय. छत्रपती शिवरायांचादेखील अपमान होतोय."

प्रियंका गांधी कोल्हापूर सभा (ETV Bharat Reporter)

पुढे काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणाल्या, "देशात दहा वर्षांपासून आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकार आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं?", असा सवाल प्रियंका गांधींनी केला. "सत्ताधारी काहीही करत नाहीत. केवळ निवडणूक आली की धर्माच्या आधारावर मत मागण्याचं काम हे करत आहेत," असं टीकास्त्रही गांधी यांनी महायुतीवर सोडलं. "गेली दहा वर्ष केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आहे. सत्ता काळात देशातील बड्या उद्योगपतींचे 16 लाख कोटींचं कर्ज माफ होतं. मात्र, मायबाप शेतकऱ्याला कर्जमाफी देताना सरकार पैसे नसल्याच सांगतं. केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला संधी मिळेल तिथं दुर्बल करते," असा आरोपही गांधी यांनी केला.

महाराष्ट्र सरकार ही मोदींनी खरेदी केलेलं : पुढं त्या म्हणाल्या, "देशात आणि राज्यात निवडणूक आली की जाती आणि धर्माच्या नावावर राजकारण करतात. राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर ते बोलले. मात्र, याच राहुल गांधींनी देशात चार हजार किलोमीटर न्याय यात्रा काढली. हे या मंडळींना दिसत नाही." तसंच भ्रष्टाचारावर बोलण्याचं तुमचं धाडस होतं कसं? महाराष्ट्राचं सरकार तुम्ही खरेदी केलं. तोडलं आणि तुम्हीच आज संविधानाची गोष्ट बोलता?", असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

तुडुंब गर्दी पाहून प्रियंका गांधी भारावल्या : देशाच्या पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनीही याच मैदानावर सभा घेतली होती. त्याच मैदानावर शनिवारी (16 नोव्हेंबर) प्रियंका गांधी यांची ही सभा पार पडली. या सभेसाठी कोल्हापुरकरांनी तुडुंब गर्दी केली होती. सभेसाठी जमलेली गर्दी पाहून प्रियंका गांधी भारावल्या होत्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या पुढाकारानं झालेल्या या सभेला राज्याचे माजी मंत्री विश्वजीत कदम, कुस्तीपटू बजरंग पुनिया, खासदार शाहू छत्रपती यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. "काँग्रेसची आणि बाळासाहेबांची विचारधारा वेगळी, पण..." प्रियंका गांधी यांचं मोदींच्या आव्हानाला प्रत्युत्तर
  2. प्रियंका गांधींची साईंच्या दर्शनानंतर राहाता येथे सभा; परंतु सभास्थळी पोस्टरवरून 'या' तीन उमेदवारांचे फोटो गायब
  3. गांधी घराण्यातून तिसरा खासदार? प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.