ETV Bharat / politics

'सत्तासोपान' गाठण्याकरिता इंडिया आघाडीसह एनडीए नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, जाणून घ्या संसदेमधील पक्षनिहाय बलाबल - INDIA Bloc Vs NDA - INDIA BLOC VS NDA

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी स्पष्ट झाले. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं 292 जागा जिंकल्यानंतर पुन्हा सत्ता स्थापना करण्याकरिता हालचाली सुरू आहेत. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीही 233 जागा जिंकून सरकार स्थापनेकरिता संख्याबळाकरिता जुळवाजुळव करत आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 8:11 AM IST

Updated : Jun 5, 2024, 10:33 AM IST

नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. बुधवारी (5 जून) काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्ष 'इंडिया अलायन्स'ची बैठक होणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचीही बैठक होणार आहे. बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही होऊ शकते. याशिवाय 5 जूनपासून राष्ट्रपती भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी सुरू होणार आहे. या तयारीसाठी राष्ट्रपती भवन 5 ते 9 जून या कालावधीत सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

मित्रपक्षांना विश्वासात पुढील रणनीती ठरवली जाईल : आंध्र प्रदेशात दणदणीत विजय नोंदवणारे तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही 5 जूनला दिल्लीत पोहोचणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष एनडीएचा भाग आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, 5 जून रोजी भारत आघाडीची बैठक आहे. यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मित्रपक्षांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलय. मित्रपक्षांना विश्वासात घेऊनच पुढील रणनीती ठरवली जाईल. त्यामुळं 5 जून (बुधवार) रोजी होणारी भारत आघाडीची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.

सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "लोकसभा निवडणुकीतील एनडीए आघाडीचा विजय हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याचं वर्णन केलंय. गेल्या 10 वर्षात सरकारनं देशहिताचे अनेक अभूतपूर्व निर्णय घेतलेत. तिसऱ्या टर्ममध्ये देश नव्या निर्णयांचा अध्याय लिहील. ही मोदींची हमी आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यावर भर देणार आहे." भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या विस्तारात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "21व्या शतकात भारताला पुढे जायचं असेल तर भ्रष्टाचारावर सातत्यानं हल्ला चढवावा लागेल. डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील एनडीए आघाडीचा विजय हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा, भारतीय राज्यघटनेवरील अतूट निष्ठेचा, विकसित भारताच्या प्रतिज्ञेचा आणि सबका साथ, सबका विकास या मंत्राचा विजय आहे."

तिसऱ्यांदा देशसेवेची संधी : पंतप्रधान पुढे म्हणाले की, "या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं जितक्या जागा जिंकल्या आहेत तितक्या जागा विरोधी पक्षांना मिळूनही जिंकता आल्या नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचं महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले की, 1962 नंतर प्रथमच दोन टर्म पूर्ण करून तिसऱ्यांदा सरकार पुन्हा येत आहे. सहा दशकांनंतर देशातील मतदारांनी नवा इतिहास रचला आहे. सहा दशकांनंतर एका आघाडीला म्हणजेच एनडीए आघाडीला सलग तिसऱ्यांदा देशसेवेची संधी मिळालीय. अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा किंवा सिक्कीम असोत, जिथं जिथं विधानसभा निवडणुका झाल्या. तिथं एनडीएला मोठा विजय मिळालाय. देशवासीयांनी भाजप आणि एनडीएवर पूर्ण विश्वास दाखवला त्याबद्दल जनतेचे खूप आभारी आहोत." भाषणानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह आणि इतर नेत्यांची केंद्रीय कार्यालयाच्या विस्तारातच बैठक घेतली. निवडणूक निकालांवर चर्चा केली.

निवडणूक आयोगानुसार अधिकृतपणे घोषित निकाल

  • भारतीय जनता पक्ष (भाजप) 240
  • इंडियन नॅशनल काँग्रेस 99
  • समाजवादी पार्टी (SP) 37
  • अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (AITC) 29
  • जनता दल (संयुक्त) 12
  • द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) 22
  • तेलुगु देसम (टीडीपी) 16
  • शिवसेना (SHS) 7
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (SHSUBT) 9
  • लोक जनशक्ती पार्टी (LJPRV) 5
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (सीपीआय(एम) 4
  • युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) 4
  • इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) 3
  • आम आदमी पार्टी (AAAP) 3
  • झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ३
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार - NCPSP 7
  • राष्ट्रीय जनता दल (RJD) 4
  • भारतीय कम्युनिस्ट पार्टी 2
  • जनता दल (JD(S) 2
  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) 2
  • राष्ट्रीय लोक दल (RLD) 2
  • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (JKN) 2
  • विदुथलाई चिरुथाईगल कच्ची (VCK) 2
  • हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAMS) 1
  • केरळ काँग्रेस (केईसी) 1
  • रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP) 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) 1
  • व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (VOTPP) 1
  • झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) 1
  • शिरोमणी अकाली दल 1
  • नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी (RLTP) 1
  • भारत आदिवासी लोकशाही पक्ष 1
  • सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) 1
  • मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK) 1
  • आझाद समाज पक्ष (कांशीराम) (AASPKR) 1
  • अपना दल (ADAL) 1
  • आजसू पार्टी - (AJSUP) 1
  • ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) 1
  • जनसेना पक्ष (जेएनपी) 2
  • युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल (UPPL) 1
  • आसाम गण परिषद (AGP) 1
  • बिजू जनता दल (BJD) 1
  • स्वतंत्र -7

एकूण 543

हेही वाचा

Last Updated : Jun 5, 2024, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.