ETV Bharat / politics

राजकीय नेत्यांची धुळवड! मुख्यमंत्री शिंदे नातवासोबत रंगले धुळवडीच्या रंगात, तर जितेंद्र आव्हाडांनी पारंपरिक पद्धतीनं केली होळी साजरी - Holi 2024 - HOLI 2024

Holi 2024 : होळी हा रंगांचा उत्सव आहे. वर्षभरातील हेवेदावे आणि अडीअडचणींचा सामना करणाऱ्या मुंबईकरांनी होळीच्या रंगात आनंदाची उधळण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह ठाण्यातील घरी धुळवड साजरी केली.

Holi 2024 CM Eknath Shinde Celebrated Holi with family and Jitendra Awhad celebrated Holi in traditional way
मुख्यमंत्री शिंदेंनी नातवासोबत खेळली होळी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 6:18 PM IST

Updated : Mar 25, 2024, 7:22 PM IST

शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई Holi 2024 : होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि सप्तरंगांचा सण आहे. होळीच्या प्रत्येक रंगात भावभावना आणि आनंद पेरत परस्परांना स्नेहाचे रंग लावण्यात मुंबईकर दंग आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी असणारं धुलीवंदन अर्थात धुळवड मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सर्व लहान, थोर सप्तरंगांमध्ये रंगून जातात. सोमवारी सकाळपासूनच मुंबईतील रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये, रहिवासी सोसायटीमध्ये तसंच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी साजरं केलं धुलीवंदन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी कुटुंबियांच्या साथीनं धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी नातू रुद्रांशच्या साथीनं पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी आणि समस्त शिंदे कुटुंबीयांनी मनसोक्त धुळवड साजरी केली. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसंच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते. कुटुंबीयांसह धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टेंभी नाक्यावर कार्यकर्त्यांसोबत देखील धुळवड साजरी केली.

आव्हाडांनी पारंपरिक पद्धतीनं केली होळी साजरी : शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदारसंघातील खारेगाव परिसरात पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी केली. यावेळी होळी सणाच्या शुभेच्छा देत त्यांनी कार्यकर्त्यांचं मार्गदर्शनही केलं.

नैसर्गिक रंगांच्या वापरात वाढ : रंगांपासून त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळं नैसर्गिक रंग वापरावेत असं आवाहन डॉक्टर्स आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय. या आवाहनाला यंदा मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळालं. यासंदर्भात बोलताना प्रकाश कॉटन मिल समितीचे सचिव ज्ञानेश्वर तेजम म्हणाले, "आम्ही आमच्या सोसायटीत सर्वांना नैसर्गिक रंग वापरण्याचं आवाहन केलं आणि सर्वांनी ते पाळलं. आम्ही पाण्याच्या फवाऱ्यामध्ये लोकांना मनसोक्त भिजून आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. त्यामुळं सर्वजण मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करत आहेत. मराठी सण आणि उत्सव तसंच परंपरा जतन व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वसण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो. वर्षभरातील हेवेदावे आणि परस्परातील मतभेद मिटवून परस्परांना स्नेहाचे रंग लावावेत एवढाच आमचा यामागील उद्देश आहे."

हेही वाचा -

  1. कोकणची अनोखी होळी; आमदार भास्कर जाधवांनी लुटला पालखी नाचवण्याचा आनंद - Holi Festival 2024
  2. होळी पार्टीचा आनंद लुटण्यासाठी ही टॉप 5 गाणी प्ले तुमच्या लिस्टमध्ये नक्की सामील करा - Top 5 Holi Song
  3. शेकडो वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील पारंपरिक राजवाडी होळी; सर्व पक्षीय नेत्यांनी घेतला आनंद - Rajwadi Holi Nandurbar

Last Updated : Mar 25, 2024, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.