ETV Bharat / politics

कोकण मतदारसंघात चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन यांनी भरला अर्ज - Graduate Constituency Election - GRADUATE CONSTITUENCY ELECTION

Konkan Graduate Constituency : कोकण पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी किशोर जैन यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (7 जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे कॉंग्रेसनंही या मतदारसंघात आपला उमेदवार दिलाय.

किशोर जैन यांनी भरला अर्ज
किशोर जैन यांनी भरला अर्ज (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 6:22 PM IST

Updated : Jun 7, 2024, 6:30 PM IST

मुंबई Konkan Graduate Constituency : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आगामी कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकडे लागलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवणुकीत एकत्रित लढत मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेल्या महाविकास आघाडीत दोन गट पडल्याचं दिसून येतंय.

कॉंग्रेसनंतर उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा कडून निरंजन डावखरे आणि काँग्रेस कडून रमेश कीर यांनी यापुर्वीच अर्ज दाखल केलाय. मनसेच्या अभिजीत पानसे यांनी माघार घेतलीय. त्यातच उद्धव ठाकरेंनी किशोर जैन यांना उमेदवारी जाहीर केल्यानं ही निवडणूक आता रंगतदार होणार अशी चिन्हं आहेत. रायगडमधील नागोठण्याचे किशोर जैन ह्यांच्या शिक्षणसंस्था असून ते व्यावसायिक आहेत. ते ठाकरे कुटूंबीयांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा परीषद सदस्य असलेले जैन हे आता पाच जिल्ह्यांत पसरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लढाईत उतरत असून आज त्यांनी बेलापूर येथील कोकण भवन इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकीकडं महाविकास आघाडी इतर जागा एकत्र लढत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात मविआकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचं दिसतंय.

मनसेची निवडणुकीतून माघार : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर निवडणुकीतून मात्र मनसेनं माघार घेतली. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अभिजीत पानसे यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर आज भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी या निवडणुकीतून मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे माघार घेत असल्याची घोषणा केली. आज सकाळीच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेचे अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, भाजपाचे नेते निरंजन डावखरे, भाजपा आमदार प्रसाद लाड यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मनसेनं या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा :

  1. कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार: निरंजन डावखरे भरणार अर्ज - Konkan Graduates Constituency 2024
  2. उद्धव ठाकरेंमुळं काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी, काय आहेत कारणं? - Lok Sabha Election Results 2024
  3. १० वर्षानंतरही काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकलं नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी - NDA gov formation

Last Updated : Jun 7, 2024, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.