ETV Bharat / politics

मुंबईत महायुतीला मोठा झटका, तर महाविकास आघाडी झेप घेणार? - Exit Poll Mumbai Survey Report - EXIT POLL MUMBAI SURVEY REPORT

Exit Poll Mumbai Survey Report : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र भाजपची डोकेदुखी वाढवत आहे. एबीपी सी-व्होटर एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी ही एनडीएला जोरदार टक्कर देत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे.

Etv Bharat Exit Poll Mumbai Survey
Etv Bharat Exit Poll Mumbai Survey (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 12:32 PM IST

Updated : Jun 2, 2024, 1:00 PM IST

मुंबई Exit Poll Mumbai Survey Report : 1 जूनला देशातील अखेरचे व सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळतील. तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं भाजपाचं 'अबकी बार 45 पार'चं स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे मुंबईतील एकूण सहा जागांपैकी मुंबई उत्तर मध्य ही भाजपची हक्काची जागा त्यांच्या हातून निसटण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम येथील लढतही रंगतदार होणार असून महायुतीला येथे धोका होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महायुतीला 45 ऐवजी 22 ते 26 : महाराष्ट्राच्या एक्झिट पोलचा निकाल हा महायुतीसाठी धक्कादायक आहे. महायुतीनं महाराष्ट्रात अबकी बार 45 पार चा नारा दिला होता. परंतु एक्झिट पोलमध्ये महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात मागील दोन वर्षात झालेल्या राजकीय घडामोडीनं महाराष्ट्राचे राजकीय गणित बदललं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपासोबत जाणे पसंत केलं. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील झाले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल न्यायालयाने दिला असला तरी सुद्धा जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण होतं. कोण गद्दार? कोण एकनिष्ठ? याचा फैसला जनतेने मतपेटीमध्ये दिला. याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. परंतु एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यात तसेच मुंबईत फटका बसणार आहे.

मुंबईत महायुतीच्या 4 जागा : मुंबईतील लोकसभेच्या एकूण सहा जागांपैकी सध्याच्या घडीला भाजप 3, शिवसेना शिंदे गट 2, शिवसेना उबाठा गट 1 अशी परिस्थिती आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने त्यांचे तीनही विद्यमान खासदारंच तिकीट कापलं. राज्यात बदललेली राजकीय समीकरणे आणि उमेदवाराची घोषणा करण्यास झालेला उशीर याचा फटका महायुतीला बसणार आहे. मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्वल निकम काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून हार पत्करावी लागू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबई दक्षिणमध्येसुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याकडून हार पत्करावी लागू शकते. तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना धोबीपछाड करू शकतात. मुंबईत महाविकास आघाडीच्या 4 जागा जिंकून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 2019 लोकसभा निकाल : 2019 च्या लोकसभा निवडणुकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागांवर विजय संपादन करत एकूण 41 जागा जिंकल्या होत्या. परंतु यंदा हा आकडा २२ ते 26 जागांपर्यंतच मर्यादित राहू शकतो असा एक्झिट पोलचा निकाल आहे.

हेही वाचा -

  1. एक्झिट पोलनुसार महायुतीचे राज्यातील ४० जागांचे स्वप्न धुसरचं, महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? - Exit Polls 2024
  2. 'एक्झिट पोल' जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये रणनीती आखण्याकरिता हालचाली सुरू, राहुल गांधी आज घेणार बैठक - Exit Poll 2024
  3. देशात 'एक्झिट पोल'नुसार मोदींचाच दबदबा; 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का, आता लक्ष अंतिम निकाल - Lok Sabha Election EXIT POLLS

Last Updated : Jun 2, 2024, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.