ETV Bharat / politics

लोकसभेला वाजलेल्या 'पिपाणी'चा आवाज विधानसभेत ऐकायला मिळणार नाही - EC On Pipani Symbol - EC ON PIPANI SYMBOL

EC On Pipani Symbol : लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळं मोठा फटका बसला असल्याची भावना शरद पवार गटानं व्यक्त केली होती. त्यांनी हे चिन्ह रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडं केली होती. त्यांच्या मागणीनंतर हे चिन्ह रद्द करण्यात आलं आहे.

EC On Pipani Symbol
शरद पवार आणि पिपाणी चिन्ह (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 3:28 PM IST

मुंबई EC On Pipani Symbol : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्टाईक रेट सर्वात जास्त पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधात अपक्ष उमेदवारांना दिले गेलेल्या पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगानं दिल्यामुळं अनेक ठिकाणी पक्षाला फटका बसला होता. त्यामुळं पिपाणी चिन्ह आयोगाच्या यादीतुन वगळण्यात यावं अशी मागणी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह गोठवलं आहे.

EC On Pipani Symbol
निवडणूक आयोगाचा आदेश (ECI)

लोकसभा निवडणुकीत बसला फटका : लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगानं 'तुतारी वाजवणारा माणूस' पक्षचिन्ह बहाल केलं होतं. तर अनेक ठिकाणी निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह वेगवेगळ्या अपक्ष उमेदवारांना दिलं होतं. त्यामुळं पिपाणी विरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस अशा प्रकारचा संघर्ष अनेक लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळं पक्षाला दहा लोकसभा मतदार संघात फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं राज्यात लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 ठिकाणी त्यांना विजय संपादन करता आला. त्यांचा स्ट्राईक रेट 80 टक्के पाहायला मिळाला. पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपानुसार दहा लोकसभा मतदारसंघांपैकी नऊ लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्ह अपक्ष म्हणून उमेदवारांना दिल्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका पक्षाला बसला.

चिन्हामुळं मतदारांमध्ये संभ्रम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला 'तुतारी वाजवणारा माणूस' पक्ष चिन्ह दिलं होतं. त्यातच लोकसभा निवडणुकीत आयोगाकडून तुतारी सारखा दिसणारा पिपाणी चिन्ह अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं होतं. त्यामुळं मतदारांमध्ये 'तुतारी वाजवणारा माणूस' आणि पिपाणी पक्ष चिन्हामुळं संभ्रम निर्माण झाला होता, त्याचा फटका पक्षाला बसला होता.

कोणत्या ठिकाणी बसला फटका : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे निवडून आले. मात्र, त्याठिकाणी पिपाणी चिन्ह असलेल्या बाबू भगरे यांनी एक लाखाच्या वर मतं घेतली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात पक्षानं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती, तर पिपाणी चिन्ह मिळालेल्या उमेदवारानं 37 हजार 62 मतं घेतली होती. याठिकाणी शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव झाला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके हे विजयी झाले. मात्र, याठिकाणी पिपाणी चिन्ह मिळालेल्या गोरक्ष आळेकर यांनी 24 हजार 625 मतं घेतली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात बाळ्या मामा निवडून आले. मात्र, याठिकाणी देखील पिपाणी चिन्ह मिळालेल्या कांचन वखरे यांनी 24 हजार 625 मतं घेतली. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने विजयी झाले. त्याठिकाणी देखील पिपाणी चिन्ह मिळालेल्या रामचंद्र घुटुकडे यांना 58 हजार 421 मतं मिळाली. बीडमध्ये बजरंग सोनवणे निवडून आले. मात्र पिपाणी चिन्ह मिळालेल्या अशोक थोरात यांना 54 हजार 850 मतं मिळाली. रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांचा 2 लाख 72 हजार मतांनी पराभव झाला, तर पिपाणी चिन्ह मिळालेल्या एकनाथ साळुंखे यांना 43 हजार 982 मतं मिळाली.

निवडणूक आयोगानं गोठवलं चिन्ह : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून काढून टाकावं अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगानं यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागेतील अशा पद्धतीचा इशारा देखील देण्यात आला होता. या पत्राची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे.

हेही वाचा :

  1. मतदारांनी वाजवली 'पिपाणी', अनेक ठिकाणी 'तुतारी'ला फटका - Lok Sabha Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.