ETV Bharat / politics

महायुतीत मिठाचा खडा, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा", चंद्रकांत पाटलांवरील 'त्या' टीकेवरुन प्रवीण दरेकर संतापले - Pune FC Road Drug Case - PUNE FC ROAD DRUG CASE

Dispute in Mahayuti : पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन राजकीय गरमागरमी झालेली दिसून येत आहे. त्यातच, माझ्या काळात असं घडलं नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडं बोट दाखवलं होतं. यावरुन आता महायुतीतील नेत्यांमध्ये आंतर्गत वादाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय.

Dispute in Mahayuti Pravin Darekar criticized Amol Mitkari over Pune Drug Case
अमोल मिटकरी आणि प्रवीण दरेकर (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 7:39 AM IST

मुंबई Dispute in Mahayuti : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून भाजपा नेते, मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याच वादात आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीदेखील उडी घेतली. अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा, असा त्यांनी टोलावजा सल्ला दिला. त्यामुळं हे प्रकरण आता अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील आणि अमोल मिटकरी यांचा वाद काय? : सध्या गाजत असलेल्या पुण्यातील ड्रग्ज आणि पब प्रकरणावरुन बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ते पालकमंत्री असताना पुण्यात असं काहीही झालं नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, त्यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणाचं खापर पुण्याचे सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर फोडलं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्याच काळात ड्रग्ज आणि पब्स संस्कृतीला उधाण आल्याची टीका केली. तसंच चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादानं ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

प्रवीण दरेकर पत्रकार परिषद (Source reporter)

मिटकरींच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर : मिटकरींनी केलेल्या आरोपांवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "अमोल मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. त्यांच्या पक्षानं त्यांच्याकडं लक्ष द्यावं. ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांना काय अधिकार आहेत, हे पक्षानं एकदा स्पष्ट करावं. ते विनाकारण बडबड करत आहेत. मागच्या एका प्रकरणात त्यांना प्रदेश अध्यक्षांनी समज दिली होती. परंतु, त्यातून त्यांनी काही धडा घेतलेला दिसत नाही. महायुतीला तडा जाईल, असं वक्तव्य त्यांनी करू नये. आपण बोलून जाता, परंतु नंतर ते महायुतीला हानिकारक ठरतं. याबाबत प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज द्यावी."

रोहित पवारांना देवेंद्र द्वेषाची कावीळ : रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, "सकाळ, दुपार, संध्याकाळ देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याशिवाय यांना दिवस जात नाही. फडणवीसांच्या नेतृत्वाचा दरारा असून भीतीपोटी त्यांना टार्गेट केलं जातंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीनं काम करणार आहोत. त्यांनी स्वतः जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. ते तुमच्या मागणीवर राजीनामा देणार नाहीत. त्यांना देवेंद्र द्वेषाची कावीळ झाली आहे", अशी जहरी टीका दरेकरांनी केली.

नेत्यांना दंगलीची झळ बसत नाही : मुस्लिम समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण द्यावं, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणालेत. यावर प्रतिक्रिया देत दरेकर म्हणाले, "कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये, अशी तरतूद संविधानात आहे. जरांगे पाटील यांनी अशा गोष्टींचा प्रश्न निर्माण करून वातावरण अजून गढूळ करू नये. आपल्या वक्तव्यानं जातीय तेढ निर्माण होऊ नये, याची आंदोलन करणाऱ्या सर्व नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे." राज ठाकरे यांनी राज्यात सध्याचे वातावरण पाहता जातीय दंगली निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावर आमदार दरेकर म्हणाले, "सरकार या गोष्टींची काळजी घेईल. दंगलसदृश्य वातावरण निर्माण होऊ देणार नाही. पुढारीपण करणाऱ्या नेत्यांना दंगलीची झळ बसत नाही. परंतु सर्वसामान्य लोकांना त्याची झळ बसते, असं दरेकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. पुणे ड्रग्ज प्रकरण; 8 आरोपींना अटक, दोन पोलीस आणि दोन बीट मार्शल निलंबित - Pune Drug Case
  2. विद्येचं माहेरघर हे ड्रग्जबरोबर पब्जचं माहेरघर होण्यासाठी सरकार जबाबदार - जयंत पाटील - Jayant Patil Criticized State Govt
  3. "ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.