ETV Bharat / politics

'डॉ भारती पवार या आम्हाला धमकावतात'; भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचे गंभीर आरोप, पदाचाही दिला राजीनामा - Dr Bharati Pawar

Lok Sabha Election : दिंडेरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यावर कार्यकर्त्यांची गळजेपी करत असल्याचा घणाघाती आरोप करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वसह सर्व पदांचा राजीनामा दिलाय. यामुळं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election
'डॉ भारती पवार या आम्हाला धमकावतात'; भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचे गंभीर आरोप, पदाचाही दिला राजीनामा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 9:20 AM IST

योगेश बर्डे पाटील

नाशिक Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीनं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावाला पक्षातून विरोध होत असल्याचं दिसून येतंय. भारती पवार या धमकावत असून विश्वासात घेत नसल्याचं सांगत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. युवा जिल्हाध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळं महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.

भारती पवार कार्यकर्त्यांची गळचेपी करतात : दिंडोरी मतदारसंघात महायुतीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत ही जागा पक्षाला जिंकता यावी यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे मात्र उमेदवार डॉ भारती पवार यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. बैठकीत तुम्ही माझी बदनामी करता तुम्हाला माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का, अशा धमकावणीची भाषा करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार या कार्यकर्त्यांची गळजेपी करत असल्याचा घणाघाती आरोप करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वसह सर्व पदांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्याकडं पाठवलाय. बर्डे पाटील यांच्या पाठोपाठ उपाध्यक्ष वैभव कावळे यांनी ही राजीनामा दिल्यानं दिंडोरी मतदारसंघात डॉ भारती पवार यांच्या अडचणीत वाढ झालीय.

अन्यथा मतदारसंघ हातातून जाईल : डॉ भारती पवार यांच्या पाच वर्षाच्या कारकीर्तीबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराज आहे. त्यांची उमेदवारी बदलली नाही, तर मतदारसंघ हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याबाबत पक्षाकडून दखल घेतली न गेल्यानं राजीनाम्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. तसंच अजून काही पदाधिकारी राजीनामाच्या तयारीत असल्याचंही भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी म्हटलंय.

माझ्यावरील आरोप चुकीचे : आमच्या पक्षसंघटनेत शिस्त आहे. माझ्यावर झालेल्या आरोपाबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष खुलासा करतील, मी प्रामाणिक काम करत आहे. बर्डे यांच्या म्हळुस्के गावातच आतापर्यंत सात ते आठ कोटींची कामं झाली आहेत. त्यांनी माझं फटाके वाजवून स्वागतही केलं होतं. त्यांच्या गावात किती निधी गेला याचीही जिल्हाध्यक्षांनी चौकशी करावी, असं भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Ajit Pawar Banner In Nashik: नाशिकमध्ये अजित पवार यांच्या बॅनरवरून दिवंगत यशवंतराव चव्हाण 'इन' आणि शरद पवार 'आउट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.