ETV Bharat / politics

कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार - Devendra Fadnavis On Onion Exports

Devendra Fadnavis On Onion Exports : सरकारनं लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 4:47 PM IST

नागपूर Devendra Fadnavis On Onion Exports : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) सुरू आहेत. या निवडणुकांच्या काळातच सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारनं मान्य केलीय. "यासंदर्भातील मागणी आम्ही वारंवार केलेली त्यानंतर आता केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी मागे घेतली आहे". त्यामुळं केंद्र सरकारचे आभारी असल्याचं मत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलंय. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते.

कांद्याचे भाव वाढत असल्यामुळं त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. मी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा केला होता. कांद्यावरील निर्यात बंदीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याची बाब, केंद्र सरकारला कळवली होती. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. विरोधकांनी नेहमी याविषयी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आणि सामान्य माणसाचे हित पाहते. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

7 डिसेंबरला लागू केली होती निर्यातबंदी : केंद्र सरकारनं 7 डिसेंबर 2023 ला कांदा निर्यातबंदी लागू केली होती. याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला. यानंतर सरकारनं NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू केली होती. मात्र, याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसंच निर्यातबंदी असताना काही ठिकाणी निर्यातदारांकडून फळांच्या बॉक्समध्ये कांद्याची तस्करी होत असल्याचं समोर आलं होतं. अखेर शुक्रवारी रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं हा नवा निर्णय घेतला. या निर्णयाचं निर्यातदारांनी स्वागत केलं असून, यामुळं शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र निर्यात शुल्क कमी करण्याची मागणीही होत आहे.

हेही वाचा -

  1. पँथर हरपला; ज्येष्ठ आंबेडकरी नेते गंगाधर गाडे यांचं निधन, 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Gangadhar Gade Passed Away
  2. अमित शाहांपासून नारायण राणेंपर्यंत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर - Uddhav Thackeray Speech
  3. तब्बल 20 वर्षानंतर संजय निरुपम यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, कोणाचा करणार एन्काऊंटर ? - Sanjay Nirupam Join Shiv Sena

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.