ETV Bharat / politics

दादांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा; अजित पवार म्हणाले "मी माझ्या पैश्याचं घालतो..." - Ajit Pawar Pune Visit

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार सध्या गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असल्यानं त्यांच्या नव्या लूकची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Ajit Pawar Pune visit
Ajit Pawar Pune visit (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 3:33 PM IST

पुणे Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बसलेला फटका पाहता महायुती तसंच भाजपामधील काही नेत्यांकडून महायुतीत अजित पवार नको असा सूर आता पुढे येऊ लागला आहे. गेल्या महिन्याभरापासून याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते विचार करतील. ते पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांना विविध प्रश्नांबाबत विचारलं असता त्यांनी याबाबत माहिती दिली.

गुलाबी जॅकेटची चर्चा : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गुलाबी कलरमधील जॅकेटची चर्चा सुरू आहे. आजकाल अजित पवार गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असल्यानं त्यांच्या नव्या लूकची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि मला काय घालायचं आहे तो माझा अधिकार आहे. मी माझ्या पैश्यानं घालतो तुमच्या कोणाच्या पैश्याचं घालत नाही. जे कपडे सर्वसामान्य लोक घालतात तेच कपडे मी घालत आहे. माझ्या विवेकबुध्दीला जे पटत असतं तेच मी करत असतो. मी ब्रँडींग, प्रमोशन असलं काही करत नाही".

तिसऱ्या आघाडीबाबत काय म्हणाले अजित पवार : अजित पवार पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "भेट घेतली म्हणून काय झालं, आज अनेक आमदार माझीपण भेट घेत आहेत. यामुळे या भेटीबाबत राजकीय अर्थ घेऊ नये." तिसऱ्या आघाडीबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "अशी बातमी मीच तुमच्या चॅनलवर बघितली आहे. यात माझीही करमणूक होत आहे."

विरोधकांवर टीका : नऊ वर्ष अर्थमंत्री असताना कधीही लाडकी बहीण तसंच लाडका भाऊ आठवला नाही असं शरद पवार म्हणाले होते. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "चुनावी जुमला म्हणून हे लोक तशा पध्दतीचा आरोप करणार. मागे देखील अर्थमंत्री असताना अनेक योजना आणल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली. त्या-त्या वेळेची परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचे असतात. ज्या पाच महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत, त्या समाजातील गरीब लोकांच्या भल्यासाठी आणल्या आहेत. आज या योजनांना मिळणारा पाठिंबा पाहता लोकांना ही योजना आवडली आहे. विरोधक काही ना काही नेरेटिव्ह सेट करत आहे."

हेही वाचा

  1. कांद्याला भाव मागण्याचा अधिकार या देशात नाही का? शरद पवारांचा मोदींना प्रश्न - Sharad Pawar Question About Onion
  2. 'आमचा पक्ष शिवसेनाच' : निवडणूक आयोगाकडं आम्ही जमा खर्च कशाचा सादर करावा? - Uddhav Thackeray
  3. विधानसभा जागा वाटपाबाबत महायुतीत संभ्रमच? भाजपा राज्यात १६० ते १७० जागा लढण्याच्या तयारीत - Assembly Elections 2024
  4. "...तेव्हा महिलांना 50 रुपये तरी दिले का?"; खासदार अनिल बोंडेंची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका - Majhi Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.