ETV Bharat / politics

सहानुभूतीवर नाही तर डोळसपणे मतदान करावं..; मंत्री दीपक केसरकराचं मुंबईकरांना आवाहन - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : मुंबई आणि उपनगरात आगामी 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, सहानुभूतीवर नाही तर डोळसपणे मतदान करावं असं आवाहन मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुंबईकरांना केलं आहे.

Minister Deepak Kesarkar
मंत्री दिपक केसरकर (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 7:34 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईकरांनी सहानुभूतीवर नाही तर डोळसपणं मतदान करावं असं आवाहन, मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलय. ते मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदतेत बोलत होते. गेल्या २५ वर्षापासून सत्तेत असताना सुद्धा मुंबईकरांसाठी ठाकरे (शिवसेना उद्धव गट) सरकारनं काही केलं नाही. केवळ मतांसाठी मराठी माणूस म्हणणाऱ्या उबाठाला निवडणुकीत तडजोड करुन पाकिस्तानवादी अतिरेक्यांच्या ताब्यात मुंबई द्यायची आहे, अशी टीका करत त्यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय.

आघाडीला मुंबईचे वावडे का? : मुंबईच्या दृष्टीनं ही महत्वाची निवडणूक असताना इंडिया आघाडीला मुंबईचे वावडे का? असा सवाल मंत्री केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. इंडिया आघाडीची पत्रकार परिषद आणि कालच्या प्रचार सभेत मुंबईचा विषय आला नाही. मुंबईसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांविरोधात लढा दिला आणि ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतात तिथे गुंतवणूक येत नाहीत. मात्र, महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर गेली असं म्हणणाऱ्या उबाठाच्या प्रचार सभेत कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे दिसतात, असं मंत्री केसरकर म्हणाले.

मुंबईसाठी काय केलं? : बाळासाहेबांनी पाकिस्तानवादी शक्तींच्या विरोधात लढा दिला होता. ज्यावेळी भारत-पाकिस्तान सामना व्हायचा तेव्हा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवले जायचे हे बाळासाहेबांनी मुंबईतून हद्दपार केलं. मात्र, तुमच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी फिरत आहेत. बाळासाहेबांमुळं मुंबई सुरक्षित होती. मात्र, आता निवडणुकीपुरती तडजोड कराल तर मुंबईकरांच्या हिताला मुकाल असा इशारा, केसरकर यांनी उबाठा गटाला दिला. मुंबादेवी, महालक्ष्मी आणि सिद्धीविनायक या तीन महत्वाच्या देवस्थांनासाठी महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना उबाठानं काय केलं? असा सवालही केसरकरांनी उपस्थित केलाय.

आमचे हिंदुत्व हाताला काम देणारे : हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो या ऐवजी देशभक्त असं बोलणाऱ्या उबाठाने मुंबईबाबत विचारलेल्या प्रश्नांवर गुळमुळीत उत्तरे देऊन मतदारांची दिशाभूल करु नये. मुंबईतील हवेत सुधारणा, पायाभूत सेवा प्रकल्प, हॉस्पिटलचा कायापालट, कॉंक्रिटचे रस्ते, कोळीवाड्यांचा विकास, वरळीमध्ये जेट्टी याबाबत सत्तेत असताना निर्णय का घेऊ शकले नाहीत, यावर उद्धव ठाकरेंनी मुंबईकर जनतेला उत्तर द्यायला हवं. महायुतीचे हिंदुत्व हे नोकऱ्या देणारे आहे. मात्र, मुंबईतील नोकऱ्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी काय केलं. मुंबईची सिस्टर सिटी जर्मनीमधील स्टुटगार्ट शहर आहे. मात्र, तेथे मराठी तरुणांना नोकऱ्या का दिल्या नाहीत, याचंही उत्तर उबाठानं द्यायला हवं. यासंदर्भात महायुती सरकारनं निर्णय घेऊन 4 लाख तरुणांना नोकरीचे करारपत्र सुपूर्द केलं. जर्मनीतील 6 शहरांमध्ये मराठी तरुणांसाठी नोकरी आणि फॅमिली व्हीजा देण्याचा करार करण्यात आल्याचं केसरकरांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. तर विधानसभा लढविणारच, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा - Manoj Jarange Patil
  2. पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलीचं फलित काय? महायुतीला फायदा होणार? राजकीय वर्तुळात विविध चर्चा - lok sabha election
  3. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, त्यामुळे काँग्रेसला पाडा - योगी आदित्यनाथ - Yogi Adityanath In Malegaon

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.